CJI DY Chandrachud Scam Messages : आपल्या देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणं वाढली आहेत. सायबर गुन्हेगार सतत नवनव्या शकला लढवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. कधी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील फोन, तर कधी ओळखीच्या व्यक्तीचा फोन अथवा त्याचं सोशल मीडिया अकाउंट हॅक करून लोकांकडे पैसे मागितले जातात. तर, काही वेळा बँक खात्याशी संबंधित माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते. बऱ्याचदा परदेशातील नोकरीचं अमिष दाखवून, फ्रॉड कॉल करून, तर कधी गिफ्ट मिळाल्याचं, लॉटरी लागल्याचं अमिष दाखवून लोकांना लुबाडलं जातं. या सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्ह्यांची परीसीमा गाठली आहे. सायबर गुन्हेगारांनी आता थेट भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सायबर गुन्हेगारांच्या नवनव्या शकला वर्तमानपत्रांमधील बातम्या वाचून आपल्याला समजतात. आता तर या गुन्हेगारांनी थेट सरन्यायाधीशांच्या नावाचा वापर केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. एका स्कॅमरने दिल्लीतील काही लोकांना तोतया सरन्यायाधीश बनवून मेसेज पाठवला होता. यामध्ये म्हटलं होतं, “हॅलो, मी सरन्यायाधीश आहे. कॉलेजियमबरोबर आमची एक महत्त्वाची बैठक आहे. मी कनॉट प्लेसमध्ये अडकलोय. मला कॅबसाठी (टॅक्सी) ५०० रुपये पाठवू शकता का? मी न्यायालयात पोहोचताच तुमचे पैसे परत करेन”. मेसेजच्या शेवटी हेदेखील सांगण्यात आलं होतं की हा मेसेज कोणत्या डिव्हाईसवरून पाठवला होता. ‘सेंट फ्रॉम आयपॅड’ (आयपॅडवरून पाठवलेला संदेश) असा दुसरा मेसेज स्कॅमरने पाठवला होता.

याबाबत सरन्यायाधीशांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर विभागात तक्रार दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. सायबर पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा >> Bihar : संशयित बाइकचोराच्या गुदद्वारामध्ये मिरची पावडर टाकली; बिहारमधली अघोरी घटना

देशात वाढती सायबर गुन्हेगारी

भारतात सायबर फ्रॉडची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. मे २०२४ मध्ये इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने (१४ सी) देशातील सायबर गुन्ह्यांबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये म्हटलं होतं की, या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात सायबर ठगांनी देशभरात शेकडो कोटी रुपये लुबाडले आहेत. देशात ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली सर्वाधिक आर्थिक फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती. या अहवालात म्हटलं होतं की देशात दररोज सात हजारांहून अधिक सायबर क्राइमच्या प्रकरणांची नोंद केली जाते. या वर्षातील सुरुवातीच्या चार महिन्यात तब्बल ४.७० हजार सायबर फ्रॉडच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cji dy chandrachud name used by scammer impersonates 500 rs for cab asc