पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस आणि सहसचिवांची बैठक घेतली. बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासंबंधी चर्चा झाली. त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आले.

काँग्रेसमध्ये काहीच दिवसांपूर्वी महत्त्वाचे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक नवीन सरचिटणीस आणि सहसचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काही राज्यांचेही पदाधिकारी बदलण्यात आले आहेत. काँग्रेस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचेल असा विश्वास पक्षाध्यक्ष खरगे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली.

हेही वाचा >>>Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

भाजप, संघाच्या फूट पाडणाऱ्या राजकारणाविरोधात लढा देणे आणि राज्यघटनेच्या संरक्षणासाठी कठोर मेहनत घेणे हे आपले काम असल्याचे खरगे आणि राहुल यांनी या बैठकीत सांगितले अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president mallikarjun kharge and rahul gandhi discussed about strengthening the party organization amy