केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करोनातून बरे झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. एम्सच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसंदर्भातील आजची घोषणाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री निशंक यांनी २१ एप्रिल रोजी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह ते म्हणाले होते की, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करावी. मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, असेही त्यांनी म्हटले होते.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवाला. करोनातून बरे झाल्यानंतर देखील अनेक जणांना व्याधींनी घेरले आहे. अनेकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात भरती होण्याची परिस्थिती ओढावली आहे.

देशात गेल्या २४ तासात आढळले १,२७,५१० रुग्ण

देशात गेल्या २४ तासात १,२७,५१० रुग्ण आढळले. ही गेल्या ४८ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील घट होतांना दिसत आहेत. गेल्या २४ तासात २,७९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २,५५,२८७ जणांनी करोनावर मात केली आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education minister ramesh pokhriyal nishank in aiims srk