G20 Summit Delhi 2023: गेल्या महिन्याभरापासून चर्चा असणारी जी२० शिखर परिषद अखेर राजधानी दिल्लीत आजपासून सुरू होत आहे. दोन दिवसीय परिषदेसाठी १९ राष्ट्रांचे प्रमुख व युरोपियन युनियनचे सदस्य दाखल झाले आहेत. याशिवाय काही निमंत्रित राष्ट्रही या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ‘भारत मंडपम’मध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या वर्षी भारताकडे परिषदेचं अध्यक्षपद आलं आहे.

Live Updates

G20 Summit Delhi 2023: जी २० शिखर परिषदेसाठी २० सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी व निमंत्रित प्रतिनिधी दिल्लीत दाखल!

17:19 (IST) 9 Sep 2023
G20 Summit : “चार हजार कोटींच्या खर्चाची गरज नव्हती, पण निवडणुकीसाठी….”; वडेट्टीवार यांनी केंद्राच्या प्रसिद्धीचे उलगडले ‘गणित’

जी-२० परिषदेचे दरवर्षी यजमान बदलत असतात. दरवर्षी २० देशांपैकी कोणत्या ना कोणत्या देशात परिषद आयोजित केली जाते. यात एवढा देखावा करण्यासारखे काही नाही. परंतु राजकीय लाभ घेण्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे अशी टीका महाराष्ट्राच्या विधान सभेतील विरोधीनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते एका वृत्त संस्थेशी आज नागपुरात बोलत होते.

वाचा सविस्तर…

16:37 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुसऱ्या सत्रातील भाषण

14:11 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: स्पेनच्या उपाध्यक्षांची प्रतिक्रिया

स्पेनच्या उपाध्यक्षा नदिया कॅल्विनो यांची प्रतिक्रिया

13:43 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: ऋषी सूनक यांचं आशादायी ट्वीट

ऋषी सूनक यांचं आशादायी ट्वीट, म्हणाले, “आपण एकत्र सर्व आव्हानांचा सामना करू शकू”

13:42 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: मोदींनी शेअर केला व्हिडीओ!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला जी २० परिषद स्थळावरचा व्हिडीओ!

13:12 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: अदानी-अंबानींनाही बायडेन-सुनक यांच्याबरोबर डिनर करणार?

नेमकं काय घडतंय दिल्लीत?

वाचा सविस्तर

12:44 (IST) 9 Sep 2023
G20 Summit : पहिल्याच भाषणात मोदींनी दिला अडीच हजार वर्षांपूर्वीच्या उक्तीचा संदर्भ; म्हणाले…

PM Modi in G20 Summit Delhi 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची राजधानी दिल्लीत आजपासून (९ सप्टेंबर) सुरू झालेल्या जी२० शिखर परिषदेत आपल्या पहिल्याच भाषणात अडीच हजार वर्षांपूर्वीचा संदर्भ दिला. तसेच भारताच्या भूमीने अडीच हजार वर्षांपूर्वीच मानवतेचं कल्याण व सुख निश्चित करण्याचा संदेश दिल्याचं नमूद केलं. या दोन दिवसीय परिषदेसाठी १९ राष्ट्रांचे प्रमुख व युरोपियन युनियनचे सदस्य दिल्लीत दाखल झाले आहेत.

सविस्तर वाचा…

12:14 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: जो बायडेन यांना थांबवून मोदींनी दिली ‘कोणार्क चक्र’ची माहिती; काय आहे याचं महत्त्व?

Delhi G20 Summit 2023 Updates: काय आहे कोणार्क चक्राचं महत्त्व? जी २० च्या भारत मंडपममध्ये का उभारली आहे त्याची प्रतिकृती?

वाचा सविस्तर

11:35 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: मोदींनी बायडेन यांना कोणार्क व्हीलबद्दल माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांना कोणार्क चक्र दाखवून त्याबद्दल माहिती दिली.

11:00 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: आफ्रिकन युनियनचा जी २० मध्ये समावेश!

आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांचा पूर्णवेळ सदस्य म्हणून जी २० मध्ये समावेश

10:57 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: जी २०मध्येही सबका साथ, सबका विकास!

जी २० मध्येही मोदींचा 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' नारा!

10:54 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: ‘India’ नव्हे, ‘भारत’ नावाची पाटी!

मोदींच्या समोर 'India' नव्हे, 'भारत' नावाची पाटी!

10:47 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: मोदींनी सर्व पाहुण्याचंं भारत मंडपममध्ये स्वागत केलं

मोदींनी सर्व पाहुण्याचंं भारत मंडपममध्ये स्वागत केलं

10:45 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: जागतिक पातळीवर विश्वासाचं वातावरण… – मोदी

जी-२० शिखर परिषदेत आपण जागतिक पातळीवर घटत चाललेल्या विश्वासाचं वातावरण पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करुयात – मोदी

10:43 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण

जी-२० परिषदेसाठी आलेल्या सर्व प्रमुखांचं भारत स्वागत करतो. आपण जमलोय त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर 'मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं' असं लिहिलं आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश जगाला दिला होता. या संदेशानिशी आपण या जी २० शिखर परिषदेला सुरुवात करुया – नरेंद्र मोदी</p>

09:39 (IST) 9 Sep 2023
G20 ची देशभर चर्चा, पण हा गट आहे तरी काय? सुरुवात कधी व कशी झाली? कार्य काय? जाणून घ्या!

Delhi G20 Summit 2023: जी-२० परिषद नेमकी आहे तरी काय? तिला एवढं महत्त्व का आहे? तिची सुरुवात कधी आणि कशी झाली? ही २० राष्ट्रं नेमकी आहेत तरी कोणती? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात!

वाचा सविस्तर

09:39 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: निर्मला सीतारमण यांचा जी २० राष्ट्रांच्या अर्थमंत्र्यांसह डिनर

निर्मला सीतारमण यांची जी २० राष्ट्रांच्या अर्थमंत्र्यांसमवेत डिनर डिप्लोमसी!

09:36 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: जी २० परिषदेआधी दिल्लीत रोषणाई!

जी २० परिषदेच्या आधी राजधानी दिल्लीत रोषणाई

09:35 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: ऋषी सुनक यांचा व्हिडीओ संदेश

मी जी २० परिषदेसाठी का आलो? ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पोस्ट केला व्हिडीओ संदेश

09:33 (IST) 9 Sep 2023
G20 India Summit: दिल्लीत ४ हजार कोटी रुपयांचा खर्च; कुणी कशावर केला?

राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या जी-२० शिखर परिषदेसाठी सुमारे ४ हजार कोटींहून अधिकचा खर्च केला आहे.

वाचा सविस्तर

09:32 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: २२० सभा, ६० शहरे अन् १५ दशलक्ष लोक, अशा प्रकारे जी २० देशाची अर्थव्यवस्था बदलणार

देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील ६० शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि जगातील विविध देशांमधून पाहुणे भारतात यायला लागले आहेत.

वाचा सविस्तर

09:31 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: जी-२० परिषदेमध्ये जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचा अर्थ काय?

नवी दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यामागच्या कारणांची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा सविस्तर

09:31 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या पार्श्वभूमीवर मिळाले?

जी २० परिषदेची शिखर परिषद ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली येथे होत आहे. तत्पूर्वी मागच्यावर्षी झालेल्या शिखर परिषदेत काय काय झाले? यावर टाकलेला प्रकाश

वाचा सविस्तर

09:29 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: आसामचे मुख्यमंत्री दिल्लीत दाखल

जी २० परिषदेसाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मांचं दिल्लीत आगमन

09:28 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: भारत मंडपमच्या आतली दृश्य!

भारत मंडपमच्या आतली दृश्य!

09:28 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: सौदी अरेबियाच्या प्रिन्सनी एक दिवस मुक्काम वाढवला

सौदी अरेबियाचे प्रिन्स जी २० परिषदेनंतर ११ सप्टेंबरलाही भारतात मुक्कामी राहणार आहेत.

09:27 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: प्लास्टिकमुक्त जी २०

भारत मंडपममध्ये प्लास्टिकमुक्त व्यवस्था ठेवण्यात आली आहे. इको फ्रेंडली भूमिकेचं समर्थन करण्यासाठी हे करण्यात आलं आहे.

09:25 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 Live: मोदींचं ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांसाठी ट्वीट

मोदींनी ट्विटरवर पोस्ट करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं केलं दिल्लीत स्वागत

09:25 (IST) 9 Sep 2023
G20 Summit 2023 in Delhi: कमळ, पृथ्वी अन् वसुधैव कुटुंबकम! जी-२० बैठकीच्या लोगोचा अर्थ काय?

जी-२० च्या रूपात जगभरातील विकसनशील आणि विकसित देश एकत्र आलेले आहेत. जी-२० राष्ट्रगटात भारतासह चीन, रशिया, अमेरिका यांसारख्या बलाढ्य देशांचा समावेश आहे.

वाचा सविस्तर

09:24 (IST) 9 Sep 2023
G20 Summit Delhi 2023 Live Update: जी२०मधील भारताचे शेर्पा कोण?

जी-२० मध्ये तीन प्रमुख क्षेत्रांवर काम करण्यात येते. त्यापैकी शेर्पा व वित्तीय क्षेत्र ही अधिकृत क्षेत्रे आहेत; तर सहभागी समूह हे अनौपचारिक क्षेत्र आहे. त्याबद्दलची इत्थंभूत माहिती जाणून घेऊ.

वाचा सविस्तर

राजधानीत महासत्तासंमेलन<br />(PTI Photo/Arun Sharma)

G20 Summit Delhi 2023: जी२० शिखर परिषदेसाठी यंदा भारताला अध्यक्षपद मिळालं आहे.