Karnataka Election 2023 How to Check Live Results : बहुप्रतीक्षित कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी १३ मे (शनिवारी) रोजी होणार आहे. २२४ सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. सध्या कर्नाटकात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. ज्याचे नेतृत्व बसवराज बोम्मई करत आहेत. पण या निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटकची सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत.

राज्यातील बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे २६१५ उमेदवारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे. यात काही एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला धक्का बसण्याची चिन्हे असून काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ इतका आहे. त्यामुळे ही मॅजिक फिगर गाठण्यात आता कोणता राजकीय पक्ष यशस्वी होईल हे उद्याच स्पष्ट होईल.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी जाहीर होईल?

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठीच्या मतमोजणीला १३ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ३६ मतमोजणी केंद्रांवर सुरुवात होईल. यानंतर सायंकाळपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी यंदा ७३.१९ टक्के मतदान झाले. यानंतर कर्नाटकातील मतदारांसह अनेक राज्यांचे लक्ष या निकालाकडे लागून आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी आणि कुठे तपासायचा जाणून घेऊ…

हेही वाचा : Karnataka Exit Polls : एक्झिट पोलवर भाजपा नाराज, काँग्रेसला गुदगुल्या, जेडीएसने मान्य केले अपयश

Karnataka Election 2023 : थेट निकाल कुठे पाहायचा?

१) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल Election Commission of India च्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता. निवडणूक मतमोजणीचे लाइव्ह अपडेट्स तुम्हाला यात मिळतील.

२) यात तुम्ही results.eci.gov.in वर जाऊनही थेट निकाल तपासू शकता.

३) शिवाय http://www.eciresults.nic.in, eci.gov.in, वेबसाइट्सवरूनही तुम्ही कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता आल्या हे पाहू शकता.

४) तसेच तुम्ही टिव्ही किंवा बातम्यांचे ऑनलाइन कव्हरेजदेखील फॉलो करू शकता.

५) ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही ‘लोकसत्ता’चा कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल २०२३ लाइव्ह ब्लॉगदेखील पाहू शकता.
Karnataka Election Results 2023 Live