Premium

गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचणं पडलं महागात, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी थेट…

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर २१ सप्टेंबरला पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

Man wearing burqa dances during Ganesh procession in Tamil Nadu
( फोटो सौजन्य – स्क्रिनग्रॅब, इंडिया टुडे )

भारतासह विदेशातही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी ढोल-ताशा आणि डीजेच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये सर्वजण तल्लीन होऊन नाचत असतात. पण, आता तामिळनाडूत गणेश मिरवणुकीमध्ये एकजण बुरखा घालून नाचत असल्याचं समोर आलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तामिळनाडूतील वेल्लोर येथे ही घटना घडली आहे. गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक व्यक्ती बुरखा घालून मिरवणुकीत नाचत असल्याचं दिसत आहे. याची तक्रार २१ सप्टेंबरला पोलिसांकडे करण्यात आली होती.

हेही वाचा : “बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल

या तक्रारीच्या आधारे पोलिसांच्या एका चमूने तपास सुरू केला. त्यानुसार विरूथपट्टू येथील एकास पोलिसांनी अटक केली आहे. अरूणकुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. दोन गटांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अरूणकुमारला पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा : iPhone 15 च्या डिलिव्हरीला उशीर, ग्राहकाने दुकानदाराला केली गंभीर मारहाण, भांडणादरम्यान कपडे फाडल्याचा VIDEO व्हायरल

तसेच, धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या प्रकरणातील अन्य लोकांचा पोलीस शोध घेत आहेत. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man wearing burqa dance ganesh procession in tamilnadu police one arrested ssa

First published on: 24-09-2023 at 14:08 IST
Next Story
पाकिस्तान: तीन महिने बलात्कार करण्याऱ्या वडिलांचा रक्तरंजित शेवट, मुलीने थेट गोळ्या घालून केला खून