Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३-२४ साठीचा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना चुकल्या आणि संसदेत एकच हशा पिकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनाही हसू अनावर झालं. मात्र, आपली चूक झाल्याचं निर्मला सीतारमण यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्याही हसल्या. त्यानंतर त्यांनी सभागृहात माफी मागत भाषणात दुरुस्ती केली. त्या बुधवारी (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना संसदेत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहनांच्या धोरणावर बोलताना निर्मला सीतारमण यांना ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ असा उच्चार करायचा होता. मात्र, भाषणात त्या ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल’ असं म्हणाल्या. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. निर्मला सीतारमण यांच्याही ही चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी ‘सॉरी’ म्हणत आपली चूक दुरुस्त केली.

हेही वाचा : डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्टअप्सना प्रोत्साहन अन् बरंच काही; अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी काय तरतूद? जाणून घ्या

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सॉरी. मला माहिती आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जुनी प्रदुषित वाहनं बदलली जातील. हे धोरण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरणाचा उल्लेख होता. आता ही जुनी सरकारी वाहनं भंगारात काढण्यासाठी या अर्थसंकल्पात आर्थिक निधीची तरतूद करण्यात येत आहे.”

हेही वाचा : Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

“राज्य सरकारंही जुनी सरकारी वाहनं आणि जुन्या रुग्णवाहिका बदलण्यासाठी सहभाग घेईल,” असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nirmala sitharaman make mistake while union budget 2023 speech in parliament pbs
First published on: 01-02-2023 at 12:40 IST