no to talks with pakistan says home minister amit shah in kashmir zws 70 | Loksatta

पाकिस्तानशी चर्चा नाही! ; गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावले; काश्मीरमध्ये पारदर्शक पद्धतीने निवडणुकांची ग्वाही

‘माझी पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा नाही, मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेशी मला बोलायचे आहे

पाकिस्तानशी चर्चा नाही! ; गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावले; काश्मीरमध्ये पारदर्शक पद्धतीने निवडणुकांची ग्वाही
श्रीनगर-बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जम्मू-काश्मीर पोलीस दलातील विशेष पोलीस अधिकारी मुदाशिर शेख यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली अर्पण केली.

बारामुल्ला : काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावले. येथे झालेल्या जाहीर सभेत पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या काश्मिरी नेत्यांवर त्यांनी टीका केली. काश्मीरमध्ये लवकरच पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

‘माझी पाकिस्तानशी चर्चा करण्याची इच्छा नाही, मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेशी मला बोलायचे आहे. मोदी सरकार हे दहशतवाद सहन करत नाही, तो नष्ट करते. जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वात शांत प्रदेश व्हावा, यासाठी आम्ही काम करत आहोत,’’ असे शाह म्हणाले. निवडणूक आयोगाने अंतिम मतदारयादी तयार केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि या निवडणुका संपूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील अशी हमीदेखील गृहमंत्र्यांनी दिली.

१९९०च्या दशकापासून दहशतवादाने ४२,००० बळी घेतले. यामुळे काश्मिरी जनतेला काय फायदा झाला? सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे यंदा आतापर्यंत २२ लाख पर्यटक काश्मीरला आले. याचा किती लोकांना फायदा झाला असेल, याची कल्पना करा..

अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बेटरेझी, मेल्डल, शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल ; ‘रेणूंच्या एकत्र विभाजना’चा शोध; कर्करोग औषधे, डीएनए मॅपिंगसाठी संशोधनाचा लाभ

संबंधित बातम्या

“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
“मी तो पक्षी आहे, ज्याचे घरटे…”, NDTV चा राजीनामा दिल्यानंतर रवीश कुमार भावूक
Gujarat Election: काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढींच्या जाहीर सभेत गोंधळ, AIMIM वर टीका करताच…
“१०० तोंडांचे रावण” म्हणणाऱ्या मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान मोदींचे प्रत्युत्तर; म्हणाले, “काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली की…”
भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले “मी बऱ्याच वर्षांपूर्वी…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Fifa World Cup 2022 : जपानचा स्पेनवर विजय, जर्मनी थेट स्पर्धेबाहेर
विवाह समुपदेशन: भांडणांत मुलांची मधस्थी नकोच नातेसंबंध,
पाथरीकरांची ‘श्रद्धा’ पण शासनाची ‘सबुरी’!; साईबाबा तीर्थक्षेत्र आराखडा तीन वर्षांपासून रखडला
रेल्वेमुळे तुळजापूर, उस्मानाबादच्या विकासाचा मार्ग मोकळा
स्मृतिभ्रंश आजार बरा करणारे औषध शोधण्यात यश ; वृद्धांना मोठा दिलासा