India Operation Sindoor Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला आहे. या मोहिमेला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव देण्यात आलं आहे.

Live Updates

India Airstrike on Pakistan: पहलगामचा बदला घेतला, भारताचा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक!

06:37 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: घर में घुसकर मारा है – सोनू निगमची पोस्ट

गायक सोनू निगमनं ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है, भारत की गद्दी पर बैठा, बाप तुम्हाला मोदी है… समझे बेटा पाकिस्तान”, असं या पोस्टमध्ये सोनू निगमनं लिहिलं आहे.

06:31 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: एअर स्ट्राईकमधील सर्व शूर अधिकारी व जवान सुखरूप परतले

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून ९ ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात भारताच्या हवाई दलाच्या शूर अधिकाऱ्यांचा व जवानांचा समावेश होता. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सर्व भारतीय अधिकारी व जवान सुखरूपपणे परतले आहेत.

06:26 (IST) 7 May 2025
India Airstrike on Pakistan: पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकचं खोटं वृत्त

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननंदेखील भारतीय हद्दीत श्रीनगर हवाई तळावर एअर स्ट्राईक केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, असा कोणताही एअर स्ट्राईक भारतावर झालेला नसल्याचं पीआयबीनं फॅक्ट चेकच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

06:23 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: कुठल्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक?

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

06:22 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेला दिली माहिती

भारतानं ऑपरेशन सिंदूरमार्फत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केल्यानंतर भारताकडून अमेरिकेला माहिती देण्यात आली आहे. त्यासंदर्भात मार्को रुबियो यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “मी भारत व पाकिस्तानमधील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. मी आशा करतो की हे सगळं लवकर संपावं. या सर्व प्रकरणावर शांततापूर्ण मार्गाने उपाय शोधण्यासाठी भारत व पाकिस्तानच्या नेतृत्वाशी मी चर्चा करत राहीन”, अशी पोस्ट अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केली आहे.

06:19 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: मनोज तिवारींनी शेअर केला व्हिडीओ

पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची पोस्ट भारतीय लष्करानं पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी सोशल मीडियावर केली आहे. पूंछमधल्या भीमबर गली परिसरात हा गोळीबार झाल्याची माहिती यात देण्यात आली आहे.

06:18 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: उत्तरादाखल पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार

भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताननंही उत्तरादाखल प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात LOC वर गोळीबार सुरू केला आहे. जम्मू-काश्मीर मधील राजौरी व पूंछ जिल्ह्याच्या सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

06:16 (IST) 7 May 2025
India Airstrike on Pakistan: मनोज तिवारींनी शेअर केला व्हिडीओ

भाजपा खासदार मनोज तिवारी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत शिरून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “२२ एप्रिल – मोदी को बता देना? ७ मे – मोदी ने बता दिया” अशी सूचक पोस्टही त्यांनी केली आहे.

06:14 (IST) 7 May 2025
India Airstrike on Pakistan: योगी आदित्यनाथ यांचं ट्वीट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “जय हिंद, जय हिंद की सेना” असं म्हणत ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल पोस्ट केली आहे.

06:13 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: एअर स्ट्राईकनंतर संरक्षण मंत्र्यांचं तीन शब्दांमध्ये ट्वीट

भारतीय हवाई दलानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी फक्त ‘भारत माता की जय’ एवढीच पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. मध्यरात्री २ वाजून ४६ मिनिटांनी राजनाथ सिंह यांनी ही पोस्ट केली आहे.

06:10 (IST) 7 May 2025
India Airstrike on Pakistan: कोणत्याही नागरी वस्तीला लक्ष्य केलं नाही!

भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य करण्यात आलं नव्हतं. शिवाय, पाकिस्तानी लष्करावर देखील हा हल्ला करण्यात आला नव्हता. या हल्ल्यात फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्यात आलं होतं. यात लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांशी संंबधित तळांना लक्ष्य करण्यात आलं.

06:09 (IST) 7 May 2025

India Airstrike on Pakistan: भारताचं ऑपरेशन सिंदूर!

भारतीय हवाई दलानं पहाटे १ वाजून ४४ मिनिटांनी पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. यात पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. या मोहिमेला भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देण्यात आलं आहे.

06:05 (IST) 7 May 2025

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, पाक दहशतवादी तळांवर हल्ले

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय उत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलं होतं. …अधिक वाचा

India Airstrike on Pakistan: पहलगामचा बदला घेतला, भारताचा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक!