पठाणकोटमधील हवाई तळावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी पाकिस्तानात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात गुजरनावालामधील दहशतवादविरोधी विभागाच्या कार्यालयामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी भारताने आतापर्यंत पाकिस्तानला दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयीन कारवाई सुरू करण्यासाठी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पठाणकोट हल्ला तपासाबाबत पाकिस्तानचे झोपेचे सोंग -पर्रिकर
पाकिस्तानातील ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचे पुरावे भारताकडून पाकिस्तानला देण्यात आले आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय चर्चा लांबणीवर पडली. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानने सहा जणांचे एक पथक स्थापन केले आहे. भारताकडून आणखी पुरावे मिळण्याची गरज आहे, असे या पथकाने परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात मागे म्हटले होते. पाकिस्तानातून भारतात करण्यात आलेल्या पाच भ्रमणध्वनी क्रमांकांबाबतचा तपास पथकाने जवळपास पूर्ण केला आहे. हे क्रमांक भारत सरकारने पाकिस्तानला उपलब्ध करून दिले होते. पठाणकोट हवाई दलाच्या तळावर २ जानेवारी रोजी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्वरेने विशिष्ट माहिती पुरविली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathankot attack pakistan police lodge fir against unknown persons