pm modi inaugurates 5g service in india mukesh ambani jio | Loksatta

संपूर्ण देशात 5G सेवा कधी उपलब्ध होणार? मुकेश अंबानी म्हणतात…!

देशातील १३ शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून संपूर्ण देशात ती सेवा उपलब्ध होण्यासाठी…

संपूर्ण देशात 5G सेवा कधी उपलब्ध होणार? मुकेश अंबानी म्हणतात…!
सुरुवातीला १३ शहरांमध्ये 5g सेवा उपलब्ध होणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीच्या प्रगती मैदानात झालेल्या कार्यक्रमात 5G सेवेचं उद्घाटन करण्यात आलं. 4G सेवेपेक्षा तब्बल १० पट वेग असणाऱ्या 5G सेवेमुळे सर्वच क्षेत्रात कामकाज वेगानं होण्यास मोठी मदत होणार आहे. १०० एमबीपीएसवरून इंटरनेटचा वेग 5G सेवेमुळे थेट १० जीबीपीएसवर जाऊन पोहोचणार आहे. त्यामुळे ‘नेट स्लो’ असल्याचं कारण आता कुणाकडूनही येणार नाही, असं मिश्किलपणे म्हटलं जात आहे. मात्र, नेमकी कुठल्या शहरांमध्ये ही सेवा कधीपासून सुरू होणार आहे? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय, या मोठ्या शहरांसह संपूर्ण भारतात ही सेवा नेमकी कधीपासून उपलब्ध होणार? असाही प्रश्न नेटिझन्सला पडला आहे. यासंदर्भात खुद्द मुकेश अंबानी यांनीच उद्घाटनाच्या कार्यक्रमात माहिती दिली आहे.

१३ शहरांपासून सुरुवात!

5G सेवा येत्या दिवाळीपर्यंत एकूण १३ शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्या नागरिकांचा मोबाईल 5G सेवेसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य अर्थात 5G Enabled असेल, अशा नागरिकांना ही सेवा वापरता येईल. अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यापैकी कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आधी सेवा सुरू केली जाईल.

संपूर्ण देशात कधी सुरू होणार?

दरम्यान, ही १३ शहरं वगळता संपूर्ण भारतात ही सेवा नेमकी कधीपासून सुरू होणार? याविषयी नेटिझन्स आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भात मुकेश अंबानींनी उद्घाटनाच्या भाषणात माहिती दिली आहे. “येत्या डिसेंबरपर्यंत जिओची 5G सेवा देशाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचेल. या सेवेचं आज प्रात्याक्षिक सादर करणं ही आमच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. आम्ही आता या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहोत. आता इंडियन मोबाईल काँग्रेस खऱ्या अर्थानं एशियन मोबाईल काँग्रेस आणि नंतर ग्लोबल मोबाईल काँग्रेस व्हायला हवी”, असं मुकेश अंबानी म्हणाले.

“5G सेवेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. कारण या सेवेमुळे शेती, सेवा क्षेत्र, व्यापार, उद्योग, असंघटित क्षेत्र, दळण-वळण, ऊर्जा व्यवस्थापन या सर्वच क्षेत्रातील कामकाज वेगाने होण्यास मदत होणार आहे. यामुळे सर्वच प्रकारचे आर्थिक व्यवहार अधिक वेगाने होतील”, असंही मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Congress President Election: अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खरगेंचा मोठा निर्णय

संबंधित बातम्या

Gujarat Election Results 2022 Live :…हे लोकशाहीसाठी घातक, नाना पटोलेंनी मांडलं स्पष्ट मत; वाचा प्रत्येक अपडेट
Himachal Pradesh Election Results 2022 Live : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची मुसंडी, भाजपा पिछाडीवर, जाणून घ्या निकाल
World’s Richest Person: एलॉन मस्क यांची मत्तेदारी मोडीत; ‘या’ व्यक्तीने पहिल्या स्थानावर घेतली उडी
“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा”, आफताबचं पोलिसांना खुलं आव्हान, खूनाचं कारणही सांगितलं
Himachal Pradesh Election Results 2022: हिमाचल प्रदेशमध्ये हालचालींना वेग; विनोद तावडेंवर बेरजेच्या गणिताची जबाबदारी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs BAN: रोहित शर्माच्या जागी येत्या सामन्यात BCCI ‘या’ खेळाडूला देऊ शकतं संधी, ‘हे’ गोलंदाजही बदलणार
“आलिया हॉलिवूडला गेली तर मी….” रणबीर कपूरच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
IND vs BAN: रोहितने दमदार खेळीने रचला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसराच खेळाडू
जेव्हा दारूच्या नशेमध्ये घरी पोहोचले होते धर्मेंद्र, वडिलांवरच केली आरेरावी अन्…
“माझा एक वर्गमित्र…”; जॅकी श्रॉफ यांनी सांगितला ‘जयकिशन’ ते ‘जॅकी’ नावाचा प्रवास