नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर बोस यांचा पुतळा बसवणार असल्याची घोषणा केलीय. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा पुतळा बसवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी म्हणाले, “संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती साजरी करत असताना मला सांगायला आनंद होतो आहे की इंडिया गेट येथे त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. हे सुभाषचंद्र बोस यांच्या योगदानाबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतिक असेल.”

नेताजी आणि आजचा भारत

“ग्रॅनाइटच्या पुतळ्याचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम दाखवण्यात येईल. मी नेताजींच्या जयंतीला म्हणजे २३ जानेवारीला त्यांच्या होलोग्रामचं अनावरण करेन,” असंही पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत नमूद केलं.

चीनने पँगोंग तलावावर पुल बांधल्यावरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा; म्हणाले, “या पुलाचं उद्घाटन करायला ते स्वत:…”

“युद्धस्मारक बांधले म्हणजे तुम्ही अमर जवान ज्योती विझवू शकत नाही”

दरम्यान, नवी दिल्लीतील इंडिया गेटवर गेली ५० वर्षे जळत असलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे. मात्र, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. अमर जवान ज्योतीची ज्योत विझलेली नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. ती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्वालामध्ये विलीन केले जात आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनीष तिवारी यांनी या निर्णयावरुन भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाने राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधले आहे. याचा अर्थ ते अमर जवान ज्योती विझवू शकतील असे नाही. जे काही केले जात आहे ती राष्ट्रीय शोकांतिका आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमर जवान ज्योती युद्ध स्मारक मशालीत विलीन करणे म्हणजे इतिहास पुसणे आहे,” असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

चिंतनधारा : स्वराज्याचा पाया सुराज्याने

काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. “आमच्या वीर जवानांसाठी जळत असलेली अमर ज्योती आज विझणार आहे, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. काही लोक देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाहीत. हरकत नाही आम्ही अमर जवान ज्योती पुन्हा एकदा आमच्या सैनिकांसाठी पेटवू,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi announcement on statue of netaji subhash chandra bose at india gate pbs
First published on: 21-01-2022 at 03:01 IST