PM Narendra Modi Interview : नुकतंच देशाच्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेत काँग्रेसवर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाची देशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुळेच देशात करोना पसरला, या त्यांच्या विधानाचा काँग्रेस पक्षाकडून देशभरात निषेध करण्यात येत आहे. त्यात आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना १० फेब्रुवारीपासून सुरूवात होत असून गुरुवारी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एएनआय वृत्तसंस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत घेण्यात आली.

या मुलाखतीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, विरोधकांवर केलेल्या टीकेबाबत देखील स्पष्टीकरण दिलं आहे.

Live Updates
20:02 (IST) 9 Feb 2022
निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे राज्यांचा दौरा शक्य झाला नाही…

निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याच राज्याचा दौरा करू शकलो नाही. कारण निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिल्या होत्या. माझा प्रयत्न असतो की मी मर्यादांचं पालन करावं. निवडणुकांची वेळ असो वा ना असो, भाजपा नेहमीच जनतेच्या सेवेत लागलेली असते.

20:00 (IST) 9 Feb 2022
उत्तर प्रदेशमधील सुरक्षा व्यवस्था…