पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे भाजपाला एक हजार रुपयांची देणगी दिली असून जनतेनेही भाजपाला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. ‘तुमच्या आर्थिक सहकार्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याचा देशसेवेचा निश्चय दृढ होईल’, असे मोदींनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आर्थिक मोर्चेंबांधणीला सुरुवात केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे एक हजार रुपये भाजपाच्या खात्यात जमा केले. यापाठोपाठ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील प्रत्येकी एक – एक हजार रुपये जमा केले.

नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जनतेला आवाहन केले आहे. ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे जनतेला भाजपाला देणगी देता येईल. पाच रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतची देणगी तुम्हाला या अॅपद्वारे देता येईल. जनतेने भाजपाला देणगी द्यावी आणि कारभारात पारदर्शकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा. तुमचा पाठिंबा आणि योगदान आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा देशसेवेचा निश्चय दृढ करेल, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, २०१६- १७ या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल ५३२ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. २०१५-१६ च्या तुलनेत यात जवळपास ४५० कोटी रुपयांची भर पडली होती. २०१५ – १६ या आर्थिक वर्षात भाजपाला ७६. ८५ रुपये देणगीस्वरुपात मिळाले होते. सोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांनी संयुक्तरित्या तयार केलेल्या पाहणी अहवालात ही आकडेवारी समोर आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi urges people to contribute to bjp through namo app donates rs