संसद अधिवेशनादरम्यान सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधींनी सोमवारी केलेल्या भाषणात मोदी सरकार व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड व मिश्किल अशा दोन्ही पद्धतीने हल्लाबोल केला. एकीकडे संसदेत या घडामोडी घडत असताना दुसरीकडे या महिन्यातील मोदींच्या विदेश दौऱ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. या महिन्यात पंतप्रधान मोदी नियोजित रशिया दौऱ्यानंतर व्हिएन्नालाही भेट देणार आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रियाही त्यांच्या विदेश दौऱ्यांच्या यादीत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शांतता परिषदेत भारताचा स्वाक्षरीस नकार

या महिन्याच्या ८ व ९ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात नुकत्याच स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या शांतता परिषदेमध्ये यासंदर्भातल्या शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास भारतानं नकार दिला आहे. रशियानं या परिषदेस उपस्थित राहण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर युद्धातील दोन्ही बाजूंच्या सहमतीने झालेला करारच शाश्वत शांती प्रस्थापित करू शकेल, अशी भूमिका भारतानं घेतली. या पार्श्वभूमीवर मोदींचा हा रशिया दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

दरम्यान, ८ व ९ जुलै रोजी रशियाच्या दौऱ्यानंतर मोदी तिथूनच पुढे व्हिएन्नाचा दौरा करणार आहेत. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. याआधी तब्बल ४१ वर्षांपूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ साली व्हिएन्ना दौरा केला होता. त्यानंतर व्हिएन्नाच्या दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.

ईशनिंदा केल्याप्रकरणी पाकिस्तानमधील न्यायालयाकडून ख्रिश्चन व्यक्तीला मृत्यूदंड, प्रार्थनास्थळं व घरं पेटवणारे मात्र मोकाट

ऑस्ट्रियाचं भारताशी नातं!

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही देशांची सर्वात आधी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले, त्यात ऑस्ट्रियाचा समावेश होता. १० नोव्हेंबर १९४९ रोजी दोन्ही देशांमध्ये यासंदर्भातली पहिली यशस्वी चर्चा पार पडली होती. त्यानंतर १९८३ मध्ये इंदिरा गांधींनी व्हिएन्नाप्रमाणेच ऑस्ट्रियालाही भेट दिली होती. त्यानंतर ऑस्ट्रियाचे चॅन्सलर फ्रेड सिनोवॅट्झ हे पुढच्याच वर्षी १९८४ साली भारतात आले होते. नोव्हेंबर १९९९ साली भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारयणन यांनी ऑस्ट्रियाला भेट दिली होती. ऑस्ट्रियाचा दौरा करणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले. तयानंतर ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष हैन फिशर यांनी २००५ साली भारत दौरा केला.

मोदींच्या रशिया दौऱ्याचं महत्त्व!

रशिया-युक्रेन युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा असेल. त्यामुळे या दौऱ्यात नेमकं काय घडतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी व व्लादिमिर पुतिन यांच्यात नेमकी काय चर्चा होते? याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. याआधी या दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट सप्टेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये झालेल्या परिषदेदरम्यान झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi visit to russia vienna austria after parliament monsoon session pmw