5G Launch In India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. त्यामुळे आता देशातील 5G ची प्रतिक्षा संपली असून नागरिकांना 5G सेवेचा आनंद घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – 5G ला सपोर्ट करणारे स्वस्त मोबाईल कोणते? नवीन फोन घेण्याआधी ‘या’ गोष्टी तपासून पहा

दरम्यान, यावेळी एअरटेल, जीओ सारख्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 5G चे प्रात्याक्षिक दाखवले. यावेळी त्यांनी ‘जिओ-ग्लास’सह इतर 5G उपकरणांची पाहणी केली. तसेच एंड-टू-एंडचे स्वदेशी तंत्रज्ञानही समजून घेतले. 5G सेवा सर्वप्रथम देशातील काही निवडक मेट्रो शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे नागरीकांना 4G पेक्षा १० पट वेगाने इंटरनेटचा वेग अनुभवता येईल.

या १३ शहरांना प्रथम वापरता येणार 5G सेवा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर देशातील १३ शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध झाली आहे. यामध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.

हेही वाचा – आजपासून 5G सेवेचा शुभारंभ! महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांसह १३ शहरांत मिळणार 5G चं सुपरफास्ट नेटवर्क; पाहा यादी

‘हे’ असतील फायदे

5G सेवा सुरू झाल्याने युजर्सचा अनुभव खूप बदलणार आहे. इंटरनेट स्पीड दहा पट वाढवण्याचा सर्वात मोठा फायदा ग्राहकांना होईल. याशिवाय व्हॉट्सअॅप कॉलमधील व्यत्ययही आता संपणार आहे. काही जीबींचे चित्रपट आता कमी वेळात डाऊनलोड होईल. व्हर्च्युअल रियल्टी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवेल. गेमिंग जग बदलेल. तसेच दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात ड्रोन आदींचा वापर करणे सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे Metaverse सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi will launch 5g services at a telecom event on 1 oct 2022 spb
First published on: 01-10-2022 at 09:12 IST