‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपाला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल; मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “अगोदर…”

खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपाला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल; मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “अगोदर…”

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी उद्योग समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. या पडझडीमुळे उद्योजक गौतम अदाणी मागील काही दिवसांपून चर्चेत आहेत. असे असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्यात जवळचे संबंध आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. ते आज (७ फेब्रुवारी) संसदेत बोलत होते.

हेही वाचा >>> बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात

“अगोदर मोदी अदाणी यांच्या विमानातून प्रवास करायचे. आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. अगोदर हे फक्त गुजरातमध्येच व्हायचे, नंतर हे भारतात सुरू झाले. अदाणी यांनी भाजपाला मागील २० वर्षांत निवडणूक रोखे तसेच अन्य मार्गाने किती रुपये दिले?” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा >>> अदाणींबरोबर पंतप्रधान मोदींचे संबंध काय? थेट राहुल गांधींनी संसदेत फोटो दाखवले; म्हणाले…

दाणी आणि पंतप्रधान यांच्यात काय संबंध आहेत, हे …

“कोणत्याही रस्त्याने चालत जा, हा रस्ता कोणी बांधला असे विचारले, तर अदाणींचे नाव पुढं येते. हिमाचल आणि काश्मीरमधील सफरचंद हेदेखील अदाणींचे आहेत. अदाणी आणि पंतप्रधान यांच्यात काय संबंध आहे, हे संपूर्ण देशाला जाणून घ्यायचे आहे,” असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अदाणींचे एक छायचित्र दाखवले.

हेही वाचा >>> अग्निवीर योजनेबाबत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप; म्हणाले, “अजित डोभाल यांनी सैन्यावर…”

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरु झाली

“२०१४ पूर्वी अदाणी जगातील श्रीमंताच्या यादीत ६०९ व्या क्रमाकांवर होते. पण, २०१४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यावर अदाणी काही वर्षांतच दुसऱ्या स्थानावर पोहचले. त्यांचे आणि पंतप्रधानांचे संबंध काय आहेत? २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर खरी जादू सुरू झाली. काही वर्षांतच अदाणी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचले,” असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 16:05 IST
Next Story
अदाणी समूहाचे जोरदार कमबॅक; शेअर्सची घसरण थांबली, ‘या’ शेअर्समध्ये तेजी
Exit mobile version