Rahul Gandhi Disqualified As MP: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून सूरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरविले असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधींची बहीण व काँग्रेस सचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी भावाची पाठराखण करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रियंका गांधी यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढताना देशातील भ्रष्टचार करणाऱ्यांचं भाजप समर्थन करत असलयाचे म्हंटले आहे तसेच काही मोठ्या घोटाळ्यांची यादी सुद्धा मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रियंका गांधी यांनी गुजरात सरकारच्या निर्णयावर ट्वीट करत म्हंटले होते की, ” माझा भाऊ कधी कोणाला घाबरला नाही ना यापुढे कधी घाबरेल. आम्ही खरं बोलत जगलोय आणि जगत राहू. या घाबराट सरकारने साम, दाम, दंड, भेद सर्वप्रकारे राहुल गांधींचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.”

प्रियंका गांधी यांनी राहुल यांची खासदारकी रद्द झाल्यावर सुद्धा एक वेगळे ट्वीट करत लिहिले की, “ज्या लोकांनी देशाचे पैसे लुटले भाजपा त्यांचा बचाव करण्यासाठी काम करत आहे, चौकशीपासून पळत आहे. आणि जी लोकं यावर प्रश्न करतात त्यांच्यावर खटले चालवण्यात येत आहेत.” असे म्हणताना नीरव मोदी घोटाळा (14,000 कोटी), ललित मोदी घोटाळा (425 कोटी) , मेहुल चोकसी घोटाळा (13,500 कोटी) यांची नावे प्रियंका यांनी नमूद केली आहेत.

प्रियंका गांधी म्हणतात, “माझा भाऊ कधी … “

प्रियंका गांधींनी मंडळी घोटाळ्यांची यादी

दरम्यान, २०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना ‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे’, असा सवाल उपस्थित केला होता. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi disqualified as mp loksabha priyanka gandhi angry tweet says bjp is saving corrupts list of frauds in india svs
First published on: 24-03-2023 at 15:17 IST