प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या असून सध्या त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या नात आहेत. तर काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांचे बंधू आहेत.
२३ जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वी, त्यांनी २००४ आणि २००७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाऊ राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. Read More