पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, असा आरोप विरोधकांनी अनेकदा केलेला आहे. मात्र यावेळच्या निवडणुकीआधी मोदींनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना पत्रकार परिषद न घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर मोदींनी पत्रकार परिषद न घेण्याचे कारण सांगितले. मी संसदेला उत्तरदायी आहे, असे सांगताना त्यांनी माध्यमांच्या बदललेल्या दृष्टीकोनावरही बोट ठेवले. तसेच आता लोकांशी संपर्क साधण्याचे इतरही मार्ग उपलब्ध झाले असल्याकडे लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांवर टीका करताना म्हटले की, आतापर्यंत असे होत होते की, माध्यमांच्या प्रतिनिधिंना मॅनेज करून काहीही बोलले तरी ते देशभरात पोहोचत होते. मला त्या मार्गाने जायचे नव्हते. मला मेहनत घ्यायची होती, गरीबांच्या घरापर्यंत मला पोहोचायचे होते. मी विज्ञान भवनात रिबीन कापून फोटो काढून प्रसिद्धी मिळवू शकलो असतो. पण मी झारखंडमध्ये छोट्याश्या जिल्ह्यात जाऊनही काम करतो. मी कामाची एक नवी संस्कृती विकसित केली. ही संस्कृती माध्यमांना योग्य वाटली तर ते त्यापद्धतीने दाखवतील. ही संस्कृती योग्य नसले तर माध्यमे त्यांना हवं ते करू शकतात.

“…तर मला फाशी द्या”, अदाणी-अंबानी मुद्द्यावरून मोदींचं थेट आव्हान; म्हणाले, “संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा…”

“दुसरी गोष्ट म्हणजे मी संसदेला उत्तरदायी आहे. मी तिथे सर्व प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी तयार आहे. तसेच माध्यमे आता पूर्वीसारखी राहिली नाहीत. याआधी मी एखाद्या माध्यम संस्थेशी बोलतोय, असे प्रतित होत असे. पण आता तसे होत नाही. आता त्या माध्यम संस्थेतील कोणत्या पत्रकाराशी बोलतोय, हे लोक पाहतात. ज्या पत्रकाराशी मी बोलतोय, तो पत्रकार सोशल मीडियावर काय लिहितो, हे लोकांना पक्क माहीत असतं. त्यामुळे माध्यमे आता वेगळी राहिलेली नाही. पत्रकारांनाही इतरांप्रमाणेच राजकीय भूमिका आहेत, हे लोकांना माहीत झालं आहे”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ईडीने जप्त केलेला पैसा देशातील गरिबांना मिळणार? पंतप्रधान मोदींचं मोठं विधान; म्हणाले, “केंद्र सरकारद्वारे…”

पूर्वी माध्यमांना चेहरा नव्हता. बातमीमागे कोण आहे, हे लोकांना कळायचे नाही. लोक विश्लेषण म्हणून एखाद्या बातमीकडे पाहायचे. आता अशी परिस्थिती नाही. तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांशिवाय पर्याय नव्हता. पण आज थेट जनतेशी संवाद साधण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जनतेलाही माध्यमाशिवाय नेत्यापर्यंत थेट आपले प्रश्न मांडता येतात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

अब की बार ४०० ची घोषणा कुठून आली?

लोकसभा निवडणुकीआधी भाजपाकडून अब की बार ४०० पार ही घोषणा देण्यात आली. मात्र ४०० हून अधिक जागा मिळाल्यानंतर संविधान बदलण्यात येईल, असे विधान भाजपाच्याच काही नेत्यांनी दिल्यामुळे विरोधकांनी रान पेटवले. ज्यामुळे भाजपाने ही घोषणा देणे बंद केले. मोदींना याबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सर्वात आधी संविधानाला कुणी नख लावले असेल तर ते पंडीत नेहरूंनी लावले. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या. जे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात होते. तसेच अब की बार ४०० पार ही घोषणा भाजपाने नाही तर लोकांनीच सर्वप्रथम दिली होती, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why dont take a press conference last decade pm narendra modi give answer kvg