आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी भेट दिली. राहुल गांधी यांनी यादव कुटुंबाकडून जाणून घेतलं की लालूप्रसाद यादव कसे आहेत? झटकेबाज पाणीपुरीचा आस्वादही घेतला. दोन बडे नेते भेटल्यानंतर ज्या औपचारीक आणि अनौपचारीक गप्पा होतात त्या झाल्या. इंडिया आघाडीचे राजद आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मुंबईतली बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी राहुल गांधींनी लालूप्रसाद यादव यांना भाजपाविषयी एक प्रश्न विचारला. त्यावर लालूप्रसाद यादव यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी: भाजपावाले तिरस्कार का पसरवतात?

लालूप्रसाद यादव : भाजपाला सत्तेची भूक प्रचंड आहे. ते भस्म्या झालेसारखे वागत आहेत. त्यातूनच तिरस्काराचं राजकारण केलं जातं.

जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा तिरस्काराचं राजकारण केलं जात नाही आणि अर्थव्यवस्था बिघडली की हे राजकारण केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? असं राहुल गांधींनी विचारल्यावर लालूप्रसाद म्हणाले हे अगदी खरं आहे. हे लोक इतका दुष्प्रचार करतात, इतकं ब्रेनवॉश करतात की लोकांची मतं बदलून जातात.

राहुल गांधी: लालूजी तुम्हाला हे वाटतं का या मागे भाजपाचा उद्देश लोकांचे पैसे लुटणं असतो?

लालूप्रसाद यादव: “अत्यंत स्वच्छपणे हेच लक्ष्य असतं. त्यामुळेच गरीबांची घरं जाळली जातात, त्यांना त्रास दिला जातो. कट करण्याचं राजकारण भाजपा कायमच करत आलं आहे.”

राहुल गांधी: तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला काय म्हणजेच आम्हाला काय सल्ला द्याल?

लालूप्रसाद यादव: “माझा सल्ला तुम्हाला हा आहे की तुमचे आई वडील, आजी-आजोबा यांनी जे देशाला नवी दिशा दाखवली, चांगल्या मार्गावर नेलं ते विसरु नका. विकासाचं राजकारण करा. देशातला तिरस्कार संपववणं खूप आवश्यक आहे.” असा सल्ला लालूप्रसाद यादव यांनी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the bjp spreading so much hatred in the country lalu prasad yadav answered to rahul gandhi question scj