Why toilet flush has two buttons: स्वच्छ आणि सुरक्षित जीवन जगण्यासाठी शौचालय असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे दोन प्रकारची टॉयलेट वापरली जातात, एक वेस्टर्न स्टाईल आणि दुसरं इंडियन स्टाईल. आजकाल बहुतांश ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतात. मॉलमध्ये जा, ऑफिसला जा किंवा मग हॉटेलमध्ये. वेस्टर्न टॉयलेटच बनवली जातात. जर तुम्ही आधुनिक टॉयलेट पाहिले असेल तर त्याच्या फ्लशमध्ये दोन प्रकारची बटणे असतात. यापैकी एक बटण आकाराने लहान तर दुसरं जरा त्याहून मोठं असतं. प्रत्येक व्यक्ती या दोन्ही बटणांचा वापर करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, फ्लशमध्ये दोन बटणे का दिली असतात? याचं कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्याच्या मॉडर्न टॉयलेटमध्ये दोन प्रकारची फ्लश बटणे असतात. दोन बटणांच्या या फ्लशला ड्युअल फ्लश (Dual Flush) म्हणतात. हा ड्युअल फ्लश खूप उपयुक्त आहे. वास्तविक, ड्युअल फ्लशमध्ये दोन बटणे असतात. एक बटण दुसऱ्याच्या तुलनेत लहान असते तर दुसरे बटण मोठे असते. मात्र, दोघेही एकमेकांशी कनेक्ट असतात आणि दोन्ही बटणे एक्झिट व्हॉल्व्हशी जोडलेली असतात. दोन्ही फ्लश बटणांमध्ये पाणी सोडण्याची क्षमता ठरलेली असते. मोठ्या फ्लश बटणाने ६ ते ९ लिटर पाणी सोडलं जातं, तर छोट्या फ्लश बटणाने ३ ते ४.५ लिटर पाणी खर्च होतं. आपल्या गरजेनुसार छोट्या किंवा मोठ्या बटणाचा वापर करता येतो. या दोन बटणांमागे पाण्याची बचत करणं हाच महत्त्वाचा उद्देश आहे.

(हे ही वाचा : भारतात पायात घालणाऱ्या स्लीपरला ‘हवाई चप्पल’ का म्हणतात? जाणून घ्या यामागील रंजक कथा )

टॉयलेट फ्लशमधील मोठ्या बटणामुळे अधिक पाणी खर्च होते. त्याच्या तुलनेत लहान फ्लश बटणाचा वापर केल्यास पाणी कमी वापरले जाते. जर प्रत्येकाने टॉयलेटच्या छोट्या फ्लशचा वापर केला तर दरवर्षी साधारण २० लिटर पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे छोट्या फ्लश बटणाचा वापर केल्यास तुम्ही पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.

अमेरिकेतील डिझायनर व्हिक्टर पापानेकने टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटणं असलेलं फ्लश देण्याची कल्पना सुचविली. सुरुवातीला यावर छोट्या प्रमाणात चाचणी केली गेली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यावर याचा वापर जगभरात होऊ लागला. या कल्पनेतून व्हिक्टरने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला. या कल्पनेतून बांधलेले पहिले शौचालय ऑस्ट्रेलियात होते. आजकाल बहुतेक घरांमध्ये ड्युअल फ्लश असतो. आजवर ड्युएल फ्लशमधल्या दोन बटणांचे कार्य माहित नसणाऱ्यांनी पाण्याचा भरपूर वापर केला असेल. आता ही माहिती वाचून पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्या..

रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही तुमच्या घरात ड्युअल फ्लश लावला असेल तर त्यामुळे पाण्याची खूप बचत होते. लहान बटण वापरल्यास दिवसभरात अनेक लिटर पाण्याची बचत होईल आणि हे पाणी आजच्या काळात खूप मौल्यवान आहे. तर सिंगल फ्लश वापरल्यास वॉशरूममध्ये भरपूर पाणी वाया जाते. ड्युअल फ्लशची किंमत सिंगलपेक्षा जास्त असते, पण थोडे जास्तीचे पैसे गुंतवून ड्युअल फ्लश बसवल्यास अनेक लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you know why toilet flush has one large and one small button know the reason behind it pdb