Bheem Kunda: आजही जगात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यांचा पत्ता आजपर्यंत लागलेला नाही. ती रहस्ये शोधण्यात शास्त्रज्ञही अपयशी ठरले आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका गूढ पूलाविषयी सांगणार आहोत, ज्‍याच्‍याबद्दल असे म्हटले जाते की शास्त्रज्ञही या पूलाची खोली आजपर्यंत शोधू शकले नाहीत. हा पूल इतर कुठेही नसून आपल्याच देशात आहे. आपण ज्या रहस्यमय पूलाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव भीम कुंड आहे. या कुंडाची कथा महाभारत काळाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याचा इतिहास महाभारताशी संबंधित आहे..

हे कुंड मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या बाजना गावात आहे. महाभारत काळाशी संबंधित या कुंडाबद्दल असे सांगितले जाते की जेव्हा पांडव वनवासात होते आणि इकडे तिकडे भटकत होते तेव्हा त्यांना तहान लागली होती, परंतु आजूबाजूला कुठेही पाण्याचा स्रोत सापडला नाही. जेव्हा द्रौपदी तहानेने व्याकूळ झाली तेव्हा नकुलाने आपल्या शक्तीने जमिनीखाली पाणी शोधले आणि भीमाने आपली गदा जमिनीवर मारून हा तलाव तयार केला. ४० ते ८० मीटर रुंद असलेले हे कुंड हुबेहुब गदासारखेदिसते.

नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी इशारा मिळतो..

हे कुंड दिसायला अगदी साधं असलं तरी याची खासियत कोणालाही आश्चर्यचकित करू शकते. किंबहुना असंही म्हटलं जातं की जेव्हा केव्हा आशिया खंडात पूर, वादळ किंवा त्सुनामी यांसारखी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा आपोआप या कुंडातील पाणी वाढू लागते. स्थानिक प्रशासनापासून ते परदेशी शास्त्रज्ञ आणि डिस्कव्हरी चॅनलनेही या गूढ कुंडाची खोली जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आजपर्यंत कोणालाही त्याची खरी खोली किती आहे ते कळू शकलेलं नाही. ज्यांनी प्रयत्न केले त्यांचीही निराशा झाली.

( हे ही वाचा: भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..)

या कुंडातील पाणी गंगेसारखे शुद्ध आहे..

असे म्हटले जाते की एकदा परदेशी शास्त्रज्ञांनी तलावाची खोली जाणून घेण्यासाठी २०० मीटर पाण्याखाली कॅमेरा पाठवला होता, परंतु तरीही त्याची खोली कळू शकली नाही. या कुंडात काही खोलवर पाण्याचे जोरदार प्रवाह वाहत असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की या कुंडाचे पाणी गंगेसारखे पूर्णपणे शुद्ध आहे आणि ते कधीही खराब होत नाही, तर सामान्यतः साचलेले पाणी हळूहळू खराब होते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mystery of bheem kunda in madhya pradesh even scientists have not been able to ascertain its depth gps