Sameer Wankhede Salary & Income: कार्डेलिया क्रूझवर छापेमारी करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले. नव्या माहितीनुसार, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या संबंधित काही ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वानखेडेंविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, या प्रकरणी तपासादरम्यान समितीचा अहवाल आला असून वानखेडे यांच्या मालमत्तेविषयी व परदेश दौऱ्यांची माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण समीर वानखेडे यांना ‘एनसीबी’मधील पदानुसार मिळणारा पगार व अन्य फायदे याविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीर वानखेडे यांचे NCB मधील पद काय? (Sameer Wankhede Designation)

सप्टेंबर २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी वानखेडे यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ‘एनसीबी’च्या विभागीय संचालकपदी नियुक्त करण्यात आले होते. नंतर त्यांचा कार्यकाळ आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आला. तो कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२१ ला संपुष्टात आला. अंतर्गत बदलांनुसार समीर वानखेडे हे आता ‘एनसीबी’मध्ये अतिरिक्त आयुक्तपदी चेन्नई येथे कार्यरत आहेत.

समीर वानखेडे यांचा सरासरी पगार किती? (Sameer Wankhede Salary)

प्राप्त माहितीनुसार, ‘एनसीबी’च्या अतिरिक्त आयुक्त पदासाठी श्रेणीनुसार ३७ हजार ४०० ते ६७ हजार इतका पगार असतो. श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना विविध भत्तेसुद्धा मिळतात. ८ हजार ७०० रुपयांपासून मिळणाऱ्या विविध भत्त्यांनुसार सरासरी १ लाख २३ हजार १०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० पर्यंत पगाराचा आकडा असू शकतो.

हे ही वाचा<< सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा महिन्याचा पगार पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त; कोणत्या सुविधा मिळतात पाहा

समीर वानखेडे यांची मालमत्ता

दरम्यान, चर्चेत असलेल्या अहवालानुसार, वानखेडे यांचे मुंबईत चार फ्लॅट असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसंच, मुंबईत त्यांच्या नावे सहा मालमत्ता असून त्या वडिलोपार्जित मालमत्ता आहेत, असंही अहवालातून स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede ncb salary per month income property aryan khan drug cbi probe case 25 lakhs bribe mumbai news svs