World most expensive pen: लेखणीत प्रचंड शक्ती असते. जे युद्ध लाखो सैनिकांच्या जोरावर जिंकता येत नाही. ते आपण एका लेखणीच्या जोरावर जिंकू शकतो. कारण लेखणी ही तलवारीपेक्षाही जास्त धारधार असते. असे विचार इतिहातील अनेक नामांकित विचारवंतांनी व्यक्त केले आहेत. अन् याच विचारांच्या पावलांवर पाऊल ठेवत या पेनाची निर्मिती करण्यात आली आहे. या पेनाच्या जोरावर जग जिंकता येऊ शकतं असं म्हटलं जातं. कारण हे जगातील सर्वात महागडं पेन आहे. पेनच्या अनेक प्रकारांबाबत तुम्ही ऐकलं असेल. ५ रूपयांपासून २०० ते ३०० रूपयाला पेन मिळतात. पण तुम्हाला अशा एका पेनाबाबत माहीत आहे का जो खरेदी करण्यासाठी लाखो रूपये नाहीतर कोट्यावधी खर्च करावे लागतात. चला जाणून घेऊ या पेनची खासियत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळा व कॉलेजच्या दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पेन वापरले असतील. हल्ली बाजारात विविध प्रकारचे पेन आले आहेत. या पेनांच्या किंमती ही १०० ते ५०० रुपयांपर्यंत असतात. मात्र तुम्हाला माहितीये जगात असे मौल्यवान पेन आहेत ज्यांच्या किंती ऐकून तुम्ही चकित व्हाल.

जगात बऱ्याच प्रकारचे पेन आहेत. या लिस्टमध्ये फुलगोर नॉक्टर्नस नावाच्या एका पेनाचाही समावेश आहे. या पेनाची किंमत ८ मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय करन्सीमध्ये ही किंमत जवळपास ६० कोटी रूपये इतकी होते. हे सर्वात नेत्रदीपकपणे डिझाइन केलेले फाउंटन पेन आहे ज्यावर १२३ माणिक, ९४५ काळे हिरे आणि सोने जडलेले आहे. या पेनाच्या निर्मितीसाठी असंख्य रुबी आणि ब्लॅक डायमंडचा वापर करण्यात आला आहे. या पेनाच्या निर्मितीसाठी ८० लाख अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ६० कोटी ७५ लाखांपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे या पेनाला अमुल्य असं म्हटलं जात आहे. हे पेन एखाद्या कलाकृतीपेक्षा कमी नाही आणि आतापर्यंत विकले गेलेलं सर्वात महागडे पेन आहे.

बोहेम रॉयल (Boheme Royal)

बोहेम रॉयल हे खूप मौल्यवान पेन आहे. मोंटब्लँक या लक्झरी पेन निर्मात्या कंपनीने हे पेन तयार केले आहे. बोहेम रॉयल पेन १८ कॅरेट सोन्याचा वापर करु बनवले आहे. याच्या वरील हिश्शावर मौल्यवान हिरे जडवले आहेत. तर, पेनाची रक्कम १.५ मिलियन डॉलर असून भारतीय रुपयांनुसार या पेनची किंमत १२ कोटी इतकी आहे.

ऑरोरा डायमांटे (Aurora Diamante)

महागड्या पेनांच्या यादीत ऑरोरा डायमांटे या पेनचा नंबर तिसरा येतो. हे पेन खूप खासपद्धतीने तयार करण्यात आलं आहे. पेनवर ३० कॅरेट हिऱ्यांसोबतच प्लॅटिनम बॅरल लावण्यात आलं आहे. या पेनाची किंमत १.२८ मिलियन डॉलर इतकी असून भारतीय रुपयांनुसार या पेनची किंमत १० कोटींहून अधिक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is worlds most expensive pen adorned with diamonds gold rubies it was auctioned for whopping rs srk