Difference Between Ex Showroom Price and On Road Price : आपल्या आवडीची बाईक किंवा कार खरेदी करणे जवळपास प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आणि ती आनंदाची पर्वणी असते. कारण- त्यासाठी लोक कष्टाने बराच काळ पैसे साठवतात. जेव्हा तुम्ही वाहन खरेदी करायला जाता, तेव्हा तुम्हाला नेहमीच एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत अशा दोन किमती सांगितल्या जातात. पण, या दोन्ही किमतींमध्ये काय फरक आहे ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाहनाची एक्स-शोरूम किंमत म्हणजे काय?

कोणत्याही वाहनाची एक्स-शोरूम किंमत म्हणजे अतिरिक्त आरटीओ, पथ कर व विमा या देयकांशिवाय असलेली वाहनाची किंमत. परंतु, रस्त्यावर कोणतेही वाहन चालविण्यासाठी ही तिन्ही देयके आवश्यक असतात.

एक्स-शोरूम किमतीमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट असतात. त्यामध्ये एक्स-फॅक्टरी फी, जीएसटी आणि वाहन डीलरचा नफा कमिशन समाविष्ट असते. या सर्व गोष्टी एकत्रित करून वाहनाची एक्स-शोरूम किंमत ठरवली जाते.

वाहनाची ऑन-रोड किंमत म्हणजे काय?

शोरूममधून रस्त्यावर वाहन आणण्यासाठी ग्राहकाला वाहनाची ऑन-रोड किंमत द्यावी लागते. ऑन-रोड किमतीमध्ये एक्स-शोरूम किंमत, आरटीओ नोंदणी, पथ कर, विमा आणि इतर लॉजिस्टिक्स शुल्क समाविष्ट आहे.

लॉजिस्टिक्स शुल्कामध्ये गोदामातून शोरूममध्ये वाहन आणण्याचा खर्च, नंबर प्लेट शुल्क आणि इतर अनेक खर्च समाविष्ट असतात.

वाहनाच्या ऑन-रोड किंमत आणि एक्स-शोरूम किमतीमध्ये काय फरक?

एक्स-शोरूम किंमत : ही किंमत कोणत्याही वाहनाची अंतिम खरेदी किंमत नसते. कोणत्याही वाहनाची एक्स-शोरूम किंमत ही ऑन-रोड किमतीपेक्षा कमी असते. त्यात इतर कोणतेही शुल्क समाविष्ट नाही.

ऑन-रोड किंमत : ही वाहनाच्या अंतिम खरेदीची किंमत आहे. एक्स-शोरूम किंमतपेक्षा ऑन-रोड किंमती नेहमीच जास्त असते. यामध्ये रोड टॅक्स, नोंदणी इत्यादी शुल्क समाविष्ट आहेत.

वाहन किंवा रस्त्यावरील वाहनाच्या किमतीवर त्याचा कसा परिणाम होतो?

वार्षिक देखभाल पॅकेज (Annual Maintenance Package)- त्यामध्ये डीलर तुमच्या वाहनाला पॉलिशिंग, साफसफाई, सर्व्हिसिंग, रस्त्यावर गाडी असताना दुरुस्तीसाठी मदत यासाठी एक वर्षासाठी शुल्क आकारू शकतो. पण, अनेक वेळा या सर्व सुविधा कार विमा कव्हरमध्ये समाविष्ट केल्या जातात.

अतिरिक्त अॅक्सेसरीज (Additional accessories)- यामध्ये फ्लोअर मॅट्स, सीट कव्हर, हेल्मेट इत्यादींची किंमत समाविष्ट आहे.

अतिरिक्त वॉरंटी (Additional warranty)- यामुळे तुमच्या वाहनाचा वॉरंटी कालावधी वाढतो.

ग्रीन सेस कर (Green Cess Tax)- हा कर प्रत्येक राज्यात वेगवेगळा असतो.

हाताळणी शुल्क (Handling Charges)- यामध्ये डीलर कारखाना ते शोरूममध्ये वाहन आणण्याचा शुल्क आणि वाहन स्वच्छ करण्याचा खर्च जोडला जातो.

विमा (Insurance)– मोटार वाहन कायद्याचे पालन केल्याशिवाय तुम्ही भारतीय रस्त्यांवर तुमचे वाहन चालवू शकत नाही, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या वाहनासाठी विमा पॉलिसी खरेदी करावी लागते.

नोंदणी शुल्क (Registration Charges)– यामुळे तुमचे वाहन आरटीओमध्ये नोंदणीकृत होते आणि तुम्हाला तुमच्या वाहनाची नंबर प्लेट मिळते.

रोड टॅक्स (Road Tax )– तुमच्या राज्यानुसार, हा कर वाहनाच्या एक्स-शोरूम मूल्यावर ३-२०% पर्यंत असतो. म्हणूनच वेगवेगळ्या राज्यांमध्ये या वाहनाच्या किमतींमध्ये फरक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the difference between ex showroom price and on road price know in detail snk