राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकांकडे २०२४ साली होणाऱ्या लोकसभेच्या दृष्टीनं पाहिलं जातं होतं. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून तीनही ठिकाणी ‘कमळ’ फुललं आहे. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीच्या ( बीआएरस ) ‘जीप’ऐवजी जनतेनं काँग्रेसच्या ‘हाता’वर विश्वास दाखवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून भाजपाकडे गेली आहेत. दुसरीकडे भाजपानं मध्य प्रदेशात सत्ता कायम ठेवली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशसह छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपानं आपली स्थिती मजबूत केली आहे. तर, कर्नाटकनंतर तेलंगणासारख्या दक्षिणेकडील राज्यांत काँग्रेसनं आपलं स्थान अधोरेखित केलं आहे.

आता देशातील १२ राज्यातील सत्तेसह भाजपा एक क्रमाकांचा पक्ष असणार आहे. तर, ३ राज्यांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असेल. दिल्ली आणि पंजाब राज्यात सत्ता असणारा आम आदमी पक्ष ( आप ) तिसऱ्या क्रमाकांवर असेल.

भाजपाची कुठल्या राज्यांत सत्ता?

भाजपाची उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरूणाचल प्रदेशमध्ये सत्ता आहे. आता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपा सत्ता स्थापन करणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत भाजपा आघाडी सरकारमध्ये आहे.

काँग्रेसची किती राज्यांत सत्ता?

एकेकाळी गल्ली ते दिल्ली सत्ता असणारी काँग्रेस फक्त तीन राज्यांमध्येच उरली आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. तर, तेलंगणात काँग्रेस सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. बिहार आणि झारखंडमध्ये काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आहेत. तामिळनाडूत काँग्रेस डीएमकेचा मित्रपक्ष आहे. पण, काँग्रेस सरकारचा भाग नाही.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp on way to rule 12 states congress himachal pradesh karnataka an telangana ssa