Kshitij Thakur : विनोद तावडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर बविआने त्यांच्यावर पैसे वाटप केल्या आरोप केला आहे. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये चार तास हा राडा सुरु होता. यानंतर त्या ठिकाणचे बविआचे उमेदवार क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) यांनी विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच एका संघाच्या ज्येष्ठ व्यक्तीने आपल्याला फोन करुन माहिती दिली होती असंही सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घटना घडली?

विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे ( Vinod Tawde ) आले होते. ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले. बविआचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली. काही वेळातच आमदार क्षितीज ठाकूर देखील हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशांची पाकिटे तावडे ( Vinod Tawde ) यांना दाखवली. यावेळी भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले. तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अधिक कुमक मागवली. सध्या पोलिसांनी हॉटेल सिल केले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. तसंच राडाही झाला होता. आता क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले क्षितिज ठाकूर?

“विनोद तावडे यांनी स्वतः सांगितलं की ते वाड्याहून विरारला आले. वाड्याला ते कशासाठी गेले होते? तिथून ते विरारला का आले? विनोद तावडे हे मोठे नेते आहेत. आमचे जुने मित्र आहेत. मी त्यांचा आदर करतो, काका हाक मारतो. मात्र पोलिसांना विनोद तावडे येणार आहेत याची माहिती नव्हती. संपूर्ण हॉटेल बुक होतं, बाहेरचे लोक येऊन बसवले जातात. एवढ्या पैशांचं वाटप सुरु असताना मी हे मानायलाच तयार नाही की पोलिसांना माहीत नव्हतं. आमचे कार्यकर्ते पोहचल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले.” असं क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) यांनी सांगितलं. तसंच त्यांनी घटनाक्रमही सांगितला.

हे पण वाचा- Vinod Tawde : “तुम्ही स्वतः या अन्…”, पैसे वाटपाच्या आरोपावरून राहुल गांधींच्या ट्वीटला विनोद तावडेंचं प्रत्युत्तर

मला आर.एस.एसच्या जुन्या कार्यकर्त्याचा फोन आला

क्षितिज ठाकूर म्हणाले, मला संघाच्या जुन्या कार्यकर्त्याचा फोन आला होता. त्यांचं नाव मी सांगणार नाही. त्यांनाही हे पटत नाही. त्यांनी फोन करुन सांगितलं होतं की विनोद तावडे मिटिंग करत आहेत. आज सकाळी ९.३० वाजता मला हा फोन आला होता. झूम कॉल करुन वसई मतदारसंघसाठी बैठक सुरु आहे असं सांगण्यात आलं. झूम कॉल आहे म्हटल्यावर आम्हाला वाटलं की त्यांच्या कार्यालयात बसून ते बैठक घेत असतील. त्यानंतर आम्हाला फोन आला की विवांता हॉटेलमध्ये हा प्रकार सुरु आहे. विनोद तावडे तिकडे आले आहेत. पैसे वाटप करणारे एजंट बोलवण्यात आले आहेत. साधारण ५०० ते ६०० लोक हॉटेलवर आहेत असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही तिथे गेलो तेव्हा सगळा प्रकार समोर आला.

विनोद तावडे असलेल्या हॉटेलमध्ये महिला कोपऱ्याकोपऱ्यांत लपून बसल्या होत्या-क्षितिज ठाकूर

j

राजन नाईक हे आमच्या समोरचे उमेदवार हॉटेलवर होते. महिलांच्या घोळक्यात मान खाली घालून ते लपून बसले होते. विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर, राजन नाईक, क्षितिज ठाकूर यांनी एकत्र येऊन उत्तर द्यायला हवी होती. त्यांचा उमेदवार महिलांच्या घोळक्यात लपून बसला होता. मतदान काय अशा पद्धतीने होणार का? २३ नोव्हेंबरला काय निकाल आहे तो दिसेल असं म्हणत क्षितिज ठाकूर यांनी महिलांचा व्हिडीओ सादर केला. ते म्हणाले यांना नाव विचारण्यात आलं सांगण्यात आलं नाही. रेस्तराँमध्ये, बाथरुममध्ये, विविध रुम्समध्ये या महिला लपून बसल्या होत्या. राजन नाईक मान खाली घालून बसले होते. या महिला कोण ? त्या का लपून बसल्या होत्या? तसंच महिलांना तिथून सोडून देण्यात आलं. जर गैरव्यवहार सुरु नव्हते तर राजन नाईक लपून का बसले होते? असा सवाल क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) यांनी केला आहे.

हॉटेलवर १९ लाख रुपये सापडले-क्षितिज ठाकूर

हॉटेलवर १९ लाख रुपये सापडले आहेत. आम्ही ते पैसे नेले नव्हते. कारण पोलीस आमच्या मागोमाग आले होते. संपूर्ण हॉटेल, मोठे दोन हॉल बुक करण्यात आले. आता निवडणूक आयोग आणि पोलिसांनी याबाबत कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला कारवाईची काही अपेक्षा नाही. आता जनता ठरवेल की काय बरोबर आणि काय चुकीचं आहे असंही क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) म्हणाले. महिलांचा मानसन्मान आमचे कार्यकर्तेही करतात. त्यामुळेच महिलांमध्ये राजन नाईक लपून बसले होते. असाही आरोप क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) यांनी केला. एकीकडे रामाचं नाव घ्यायचं दुसरीकडे पैशांचं वाटप करायचं. याला काय म्हणायचं? असाही सवाल क्षितिज ठाकूर ( Kshitij Thakur ) यांनी केला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshitij thakur serious allegation bjp leader vinod tawde why females are there scj