Exit Poll 2024 Result Updates: लोकसभा निवडणूक पार पडली आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते निवडणूक निकालाकडे. मात्र आज निवडणूक संपल्यानंतर म्हणजेच सातवा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. यामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारच देशात येईल हे जवळपास प्रत्येकच एक्झिट पोलने म्हटलं आहे. मात्र अशात भाजपासह एनडीएचं ४०० पारचं स्वप्न पूर्ण होणं हे अवघड दिसतं आहे असं हे अंदाज सांगत आहेत. एकाही एक्झिट पोलने भाजपासह एनडीए ४०० पार जाईल असं म्हटलेलं नाही. कुठला सर्व्हे काय सांगतो आहे? हे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिपब्लिक भारत-मैट्रीजच्या सर्व्हेने काय अंदाज वर्तवलाय?

एनडीए – ३५३ ते ३६८ जागा
इंडिया आघाडी – ११८ ते १३३ जागा
इतर- ४३ ते ४८ जागा

रिपब्लिक PMARQ चा अंदाज काय?

एनडीए – ३५९ जागा
इंडिया आघाडी – १५४ जागा
इतर- ३० जागा

हे पण वाचा- Exit Poll 2024 Live Update : Axis-Myindia पोलनुसार उद्धव ठाकरे गट राज्यात दुसऱ्या स्थानी; अजित पवार गटाला २ तर शरद पवार गटासाठी…

जन की बातच्या एक्झिट पोलचा अंदाज काय?

एनडीए- ३६२ ते ३९२ जागा
इंडिया आघाडी- १४१ ते १६१ जागा
इतर- १० ते २० जागा

इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा अंदाज काय सांगतो?

एनडीए -३७१ जागा
इंडिया आघाडी- १२५ जागा
इतर – ४७ जागा

एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेचा अंदाज जागा काय?

एनडीए-३५३ ते ३८३ जागा
इंडिया आघाडी- १५२ ते १८२ जागा
इतर – ४ ते १२ जागा

चाणक्यचा सर्व्हे काय सांगतो आहे?

एनडीए ४०० ते ४१५ जागा
इंडिया आघाडी- १०७ ते १११ जागा
इतर ३६ जागा

वरील सगळे अंदाज पाहिले तर चाणक्य वगळता सगळ्यांनीच एनडीएला ३५० जागा आणि त्यापेक्षा अधिक जागा दिल्या आहेत हे दिसून येतं आहे. ५४३ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी २७३ ही मॅजिक फिगर आहे. अशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी थेट लढत होती. इंडिया आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर केला नाही. तर नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट करतच एनडीएने ही निवडणूक लढवली. अशात ३५० किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. मात्र ४०० पार जागा जाणार नाहीत हे देखील स्पष्ट होतं आहे. त्यामुळे भाजपासह एनडीएचं ४०० पारचं स्वप्न भंग होईल असं हे पाच पोल सांगत आहेत.

एक्झिट पोल्स काय सांगत आहेत?

१९८९ नंतर देशाने स्थिर सरकार पाहिलं नव्हतं. मात्र २०१४ ला देशाला एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि आम्ही सत्तेवर आलो. आता तिसऱ्यांदाही नरेंद्र मोदीच पंतप्रधान पदी विराजमान होतील असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी व्यक्त केलं आहे. भाजपाने ४०० पारचा नारा दिला आहे. तसंच एकटा भाजपा हा पक्ष ३७० जागा जिंकण्याचा दावा करतो आहे. मात्र एक्झिट पोलचे हे अंदाज पाहिले तर ४०० पारचं स्वप्न हे काही पूर्ण होताना दिसत नाहीये हेच हे अंदाज सांगत आहेत. आता ४ जून रोजी नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election exit poll results 2024 how much seats will win bjp india alliance know about polls scj