Madhya Pradesh Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा दीड वर्षांचा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली होती. मात्र, सर्व एग्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवत मध्य प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली, तर काँग्रेस पिछाडीवर पडली. २३० विधानसभा मतदारसंघांच्या या राज्यात बहुमताचा जादुई आकडा ११६ इतका आहे. तो भाजपाने सहजपणे पार केला आहे. आजच्या या मतमोजणी आणि निकालाच्या प्रत्येक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
MP Assembly Election Result 2023 Live Updates : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालाच्या प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स…
भाजपा मध्य प्रदेशमध्ये पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करेल. आमचं पुढचं ध्येय २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २९ जागा जिंकणं हे आहे. काँग्रेसला त्यांचा पराभव समजला आहे. यावेळी आमचा ऐतिहासिक विजय होईल.
– क्रिष्णा गौर (भाजपा उमेदवार, गोविंदपुरा, भोपाळ)
#WATCH | Madhya Pradesh: BJP candidate from Bhopal's Govindpura, Krishna Gaur says, "…BJP will form a government with full majority in Madhya Pradesh. Our next target is to win all 29 seats in the 2024 Lok Sabha…Congress has understood its defeat. It will be a historic win… pic.twitter.com/Yhejgpn226
— ANI (@ANI) December 3, 2023
आम्ही मोठ्या बहुमताने मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकू. भाजपाला १५० हून अधिक जागा मिळतील आणि आमचं सरकार स्थापन होईल.
– विश्वास सारंग (वैद्यकीय शिक्षण मंत्री, मध्य प्रदेश)
#WATCH | Madhya Pradesh Elections 2023 | MP Medical Education Min Vishwas Sarang says, "…We will win with a great majority. BJP will get more than 150 seats & form government…" pic.twitter.com/RaVEEToUXD
— ANI (@ANI) December 3, 2023
भोपाळमध्ये मतमोजणीची तयारी सुरू, थोड्याच वेळेत मतमोजणीला सुरुवात होणार
#WATCH | Madhya Pradesh: Preparations underway at the counting centre in Bhopal as the counting of votes will begin shortly. pic.twitter.com/Qn5gCsGbiV
— ANI (@ANI) December 3, 2023
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? काय सांगतायत एग्झिट पोल?https://t.co/FUawdQaetu << येथे वाचा सविस्तर वृत्त #exitpoll2023 #madhyapradesh #assemblyelection #election2023 pic.twitter.com/cPQHdDAfwa
— LoksattaLive (@LoksattaLive) November 30, 2023
मध्य प्रदेशमध्ये २०१८ चा अपवाद वगळता २००३ पासून दोन दशके भाजपची सत्ता राहिली आहे. त्यापैकी १६ वर्षे शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जनमत विरोधात जाण्याची भाजप आणि शिवराज या दोघांनाही भीती असल्याने त्यांना सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागत आहे. त्यामुळेच कदाचित भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. भाजपची सर्व भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असून त्यांनी काँग्रेस राजवटीतील गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारातून ऐरणीवर आणला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय योजनांचा राजकीय लाभ मिळाला तसा मध्य प्रदेशातही मिळेल असा भाजपचा विश्वास आणि विद्यमान कारभाराला लोक विटले असल्याने स्थानिक मुद्दय़ांच्या आधारे यंदा स्पष्ट बहुमताची काँग्रेसची उमेद, यांचा हा सामना आहे..
मध्य प्रदेशमध्ये जनता भाजपाला पुन्हा सत्ता देते की काँग्रेसला संधी देते हे पाहणं महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आणि निकालाच्या सर्व लाईव्ह अपडेट्स…