The Kashmir Files Remark Controversy : यावर्षी सर्वात चर्चेत राहिलेला चित्रपट म्हणजे ‘द काश्मिरच्या फाइल्स’, तद्दन बॉलिवूड मसालपटांपेक्षा हा चित्रपट वेगळा होता. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून ते प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावर टीका झाली तितकंच या चित्रपटाचं कौतुक झालं आहे. आता याच चित्रपटावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. सध्या गोव्यात ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ हा चित्रपट महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात एका इस्त्रायलमधील दिग्दर्शकाने चित्रपटासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे ज्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक?

इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड यांनी या कार्यक्रमात चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हणाले की, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगंडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड म्हणाले.

लॅपिड यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर आता मनोरंजन क्षेत्रामधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून अनेकांनी लॅपिड यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात काम केलेले अभिनेते अनुपम खेर यांनी आपली नाराजी व्यक्त केली असून ते असे म्हणाले, “असत्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती छोटीच असते,” असे त्यांनी ट्वीट करत सांगितले. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही लॅपिड यांच्यावर टीका करत हा काश्मिरी जनतेचा अपमान असल्याचं त्याने सांगितले. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीदेखील ट्वीटरवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे ते असे म्हणाले की, “सत्य ही फार भयानक गोष्ट आहे, सत्य कोणालाही खोटं बोलायला भाग पाडू शकतं.” इतकेच नव्हे तर या प्रकरणाची दखल इस्त्रायलचे भारतामधील राजदूत नाओर गिलॉन यांनीदेखील घेतली असून त्यांनी लॅपिड यांचे कान टोचले आहेत. याच चित्रपटातील आणखीन एक कलाकार, दर्शन कुमारने यावर आपली प्रतिक्रिया दिली तो असं म्हणाला, “प्रत्येकाचं त्यांनी पाहिलेल्या गोष्टीबद्दल मत असतं. पण ‘कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट कश्मीर पंडितांच्या परिस्थितीवर भाष्य करणारा आहे, हे सत्य आहे. ते अजूनही दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या क्रूर छळाविरोधात न्याय मिळवण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे हा चित्रपट वल्गर नसून सत्य परिस्थितीवर भाष्य करणारा आहे.”

IFFI मधील इतर ज्युरींनी लॅपिड यांनी चित्रपटावर केलेल्या टीकेवर त्यांचं मत व्यक्त मांडलं आहे. लॅपिड यांनी चित्रपटाबद्दल केलेलं भाष्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच कोणीही राजकीय टिप्पणी केली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

विश्लेषण: चित्रपटसृष्टीत अनेकदा खळबळ उडवून देणारा ‘कास्टिंग काऊच’ प्रकार आहे तरी काय? कोण-कोण अडकलं जाळ्यात?

कोण आहेत नदाव लॅपिड?

नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. मूळचे इस्राईलच्या तेल अवीव शहरातले असून त्यांनी तत्त्वज्ञानाची पदवी घेतली. नदाव लॅपिड यांनी काही काळ लष्करामध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी घेण्यासाठी ते इस्राइलला परतले. सिनोनिम्स’, किंडरगार्टन टीचर’ (२०१९), ‘पोलिसमॅन’ (२०११) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. २०१६ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही त्यांनी आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून काम पाहिले.

काश्मीर फाइल्स’ चित्रपटाबद्दलचे इतर वाद :

मध्यंतरी हा चित्रपट ऑस्करला जाणार अशी चर्चा रंगत होती. यावर दिग्दर्शक अनुराग कश्यप ‘काश्मीर फाइल्स’ ऐवजी ‘आरआरआर’ हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर कॅनडामधील दिग्दर्शक डिलन मोहन ग्रे यांनी अनुराग कश्यपला समर्थन देत एक ट्वीट केलं होतं. यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चित्रपगृहात हा चित्रपट लावण्यात आला नव्हता. मात्र तरीदेखील चित्रपटाने चांगली कमाई केली. सिंगापूरमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. तिकडच्या सरकारचे मते हा चित्रपट ‘एकांगी असून धार्मिक भावना भडकावणारा’ हा चित्रपट आहे. बॉलिवूडमधूनदेखील स्वरा भास्करने या चित्रपटावर टीका केली होती. टीव्ही जगतातील प्रसिद्ध कार्यक्रम कपिल शर्मा या कार्यक्रमाने या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. केवळ इस्रायलच्या दिग्दर्शकाने नव्हे तर विरोधी पक्षानेदेखील हा चित्रपट प्रपोगंडा असल्याचे सांगितले होते.

विश्लेषण: विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत स्थलांतरित खेळाडूंचा दबदबा? कोणत्या संघात असे सर्वाधिक खेळाडू?

काय आहे ‘ काश्मीर फाइल्स’ :

‘द काश्मिरच्या फाइल्स’ या ९० च्या दशकातील राजकीय परिस्थिती आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवाया यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कशाप्रकारे तिथल्या प्रत्येक हिंदू कुटुंबाचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं, ज्यांनी विरोध केला त्यांना जीवे मारण्यात आलं आणि कित्येक लोकांनी पलायन केलं याबद्दल हा चित्रपट उघडपणे बाजू घेऊन भाष्य करतो. काश्मीरमध्ये झालेल्या या नरसंहाराला हा चित्रपट प्रेक्षकांपुढे ठेवतो. ‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली. ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained nadav lapid criticizes the kashmir files calling it vulgar and propaganda spg
First published on: 29-11-2022 at 13:04 IST