बॉलिवूड आणि त्यामागची झगमगती दुनिया, या बॉलिवूडचे आकर्षण नाही असे फार कमी लोक आढळतील. प्रत्येक अभिनेत्याचं, अभिनेत्रीचं स्वप्न असतं की आपल्याला एकदा तरी बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. भारतातून लाखो कलाकार या बॉलिवूडमध्ये येत असतात मात्र फार कमी कलाकारांना संधी मिळते. या बॉलिवूडमध्ये सहजासहजी संधी मिळत नाही. त्यातच कास्टिंग काऊच हा प्रकार सध्या चर्चेत आला आहे. तसा हा प्रकार जुना असला तरी काही वर्षात तो चर्चेत आला आहे.

आज आपण एखादा चित्रपट बघतो त्यात काम करणारे कलाकार कुठून आले असतील किंवा त्यांना काम कसे मिळाले असेल यावर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो. कास्टिंग डायरेक्टरच्या मदतीने दिग्दर्शक कलाकारांना निवडतो. तर कास्टिंग काऊच म्हणजे या मनोरंजन क्षेत्रात एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रींकडून लैंगिक सुखाची मागणी करणे त्याबदल्यात त्याला चित्रपटात भूमिका देणे. ही प्रथा अमेरिकेत बेकायदेशीर मानली जाते. मात्र आपल्याकडे या प्रथेचे अनेक कलाकार बळी पडले आहेत.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

पुरुष कास्टिंग डायरेक्टर, अथवा चित्रपट निर्माते अभिनेत्रींकडून सेक्स मिळविण्यासाठी कास्टिंग काउचचा वापर करतात. हा प्रकार चित्रपटसृष्टीत फार पूर्वीपासून सुरु आहे मात्र या विरोधात अभिनेत्रींनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. स्त्रीवाद आणि महिला सबलीकरण हे सर्वाधिक चर्चेचे विषय बनल्यामुळे, बॉलिवूड चित्रपट उद्योगातील अभिनेत्री समस्यांबद्दल अधिक स्पष्टपणे बोलू लागल्या आहेत. केवळ बॉलिवूडचं नव्हे तर हॉलिवूडमध्येदेखील या विरोधात आवाज उठवण्यात आला. हार्वे वेनस्टाईन घोटाळा जेव्हा बाहेर आला तेव्हा अनेक अभिनेत्रींनी आवाज उठवला होता. चार्लीझ थेरॉन, थँडी न्यूटन, रीझ विदरस्पून, जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रींनी आपल्याबरोबर घडलेल्या कास्टिंग काऊच बद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. बॉलिवूडमध्ये आज काही प्रतिष्ठित कास्टिंग करणाऱ्या संस्था आहेत. मुकेश छाब्रा यांची संस्था प्रसिद्ध आहे

विश्लेषण : लष्करासंदर्भातील एका ट्वीटनं राजकीय वातावरण तापलं; रिचा चड्ढासंदर्भातील नेमका वाद काय? अनेकदा अडकली वादात

अनेक प्रसिद्ध किंवा जे पडद्यापुढे आलेले नाहीत अशा कलाकरांना याचा सामना करावा लागला आहे. केवळ अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेत्यांनादेखील याचा करावा लागला आहे. टीव्ही अभिनेता परम सिंगने नुकत्याच दिशम लेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की “एका कास्टिंग डायरेक्टरने त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.” रणवीर सिंग आज बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता आहे त्यानेदेखील अनुभव सांगितला आहे, तो म्हणाला “बॉलिवूडमध्ये हे सामान्य आहे. मीदेखील याचा सामना केला आहे.” अभिनेत्रींनमध्ये कंगना रनौत, नीना गुप्ता, मल्लिका शेरावत, सुरवीन चावला, राधिका आपटे, चित्रांगदा सेन, मौशमी उदेशी,प्रीती जैन या प्रसिद्ध अभिनेत्रींना सामना करावा लागला आहे. काही अभिनेत्रींनी आपल्याला बरोबर घडलेला प्रकार उघड्पणे व्यक्त केला आहे. मात्र काही अभिनेत्री आहेत ज्यांच्याबरोबर हा प्रकार घडला मात्र व्यक्त झाल्या नाहीत. किंवा या आमिषाला बळी पडूनदेखील त्यांना काम मिळाले नाहीत असे अनेक कलाकार असतील. सध्या बॉलिवूडमुळे मी टू चळवळदेखील मोठया प्रमाणावर दिसून येत आहे.