हृषिकेश देशपांडे
राजस्थानमध्ये निवडणुकीत चुरस आहे असे वक्तव्य खुद्द काँग्रेस
वसुंधराराजे पुन्हा सक्रिय…
राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलते असा गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव आहे. राज्यात काँग्रेस-भाजप यांच्या सत्ता बदलाची ही परंपरा आहे. आता राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे आता भाजपला संधी मिळणार काय, हा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणखी वाचा-‘फाइव्ह आइज’ कराराअंतर्गत अमेरिकेकडूनच कॅनडाला निज्जर हत्येचे धागेदोरे? काय आहे हा करार?
जाट मतांवर लक्ष
काँग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयपूरमधील सभेत मिर्धा यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. नागौरमधील जाट समुदायातील प्रमुख नेत्या अशी त्यांची ओळख आहे. राज्यातील २० ते २५ जागांवर जाट मतदान निर्णायक मानले जाते. त्यामुळे पक्षात नव्या असून देखील त्यांना महत्त्व देण्यात आले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे हनुमान बेनिवाल यांना टक्कर देण्यासाठी ही भाजपची रणनीती मानली जाते. बेनिवाल हे नागौरचे खासदार असून, भाजपपासून दुरावले आहेत. त्यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष आहे. काँग्रेस किंवा भाजपशी आघाडी करणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ज्योती यांच्या प्रवेशाने नागौर भागातील विधानसभेच्या ६ ते ८ जागांवर भाजपला लाभ होऊ शकतो. काँग्रेसचे जुने नेते नथुराम मिर्धा यांच्या ज्योती या नात असून, त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. हरयाणातही ज्योती यांच्या प्रवेशाचा लाभ उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
आणखी वाचा-‘राज्यातील सहकार क्षेत्र उदध्वस्त करण्याचा प्रयत्न’, केरळने केंद्र सरकारवर आरोप का केला?
गेहलोत-पायलट मनोमीलन?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत व काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांच्यात गेली पाच वर्षे संघर्ष सुरू आहे. त्यातून पायलट यांना उपमुख्यमंत्रीपद गमवावे लागले. एक वेळ पायलट पक्ष सोडतात काय, अशी स्थिती होती. मात्र आता सचिन पायलट यांनी गेहलोत यांच्याशी जमवून घेतले आहे. मात्र दोघांच्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले नाही ही पक्षासाठी चिंता आहे. ७२ वर्षीय अशोक गेहलोत हे मुरब्बी राजकारणी मानले जातात. त्यांच्या विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांमुळे पक्षाला राज्यात पुन्हा आशा आहे. २७ सप्टेंबरपासून ते ९ दिवस राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. एकीकडे राजस्थान राखण्यासाठी काँग्रेसने शर्थ चालवली असतानाच, पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यात चुरस आहे असे वक्तव्य केले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडच काय, पण तेलंगणाही जिंकू असा आत्मविश्वास बाळगणारे राहुल गांधी राजस्थानबद्दल साशंक आहेत. पक्षाच्या सर्वेक्षणांच्या आधारावर दिल्लीत बोलताना राहुल यांनी हे भाष्य केले असावे असा तर्क मांडला जात आहे. विकासाचे आदर्शवत प्रारूप असे राजस्थानचे वर्णन अशोक गेहलोत करत आहेत. मग सत्ता राखण्याबाबत पक्ष नेत्यांनाच चिंता कशी? त्यामुळे राहुल यांनी राजस्थानबद्दल संदिग्ध भाष्य करून भाजपच्या प्रचाराला बळ दिल्याचे मानले जात आहे.
मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is there chance for bjp in rajasthan why does rahul gandhi have doubt about congress victory print exp mrj