विश्लेषण : वरुण धवनचा पुढचा चित्रपट त्याचे करिअर वाचवू शकतो का?

वरुण धवनच्या करिअरला ब्रेक लागण्यामागचे नेमकं कारण काय?

varun dhawan career
वरुण धवन

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा अतिशय लोकप्रिय कलाकारांपैकी एक म्हणून ओळखला जातो. वरुणने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. वरुणने स्वबळावर सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनोदी अंदाज, नृत्यकौशल्य आणि इंडस्ट्रीत सर्वांशी मिळतंजुळतं यामुळे त्याची सर्वत्र चर्चा असते. सध्याच्या घडीला बी- टाऊनमधील काही प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये गणला जाणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून वरुण धवनच्या सिनसेृष्टीतील करिअरबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

वरुण धवन आणि कियारा आडवाणी यांचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र जुग जुग जियो या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत होती. मात्र तरीही हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ ५६.७ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे वरुण धवनच्या सिनेसृष्टीच्या करिअरला कुठेतरी ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. पण वरुण धवनच्या करिअरला ब्रेक लागण्यामागचे नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला तर जाणून घेऊया.

विश्लेषण : ऑस्करसाठीचे नामांकन आणि विजेते कसे निवडले जातात? जाणून घ्या…

सलग चार चित्रपट फ्लॉप

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वरुण धवनचे सलग चार चित्रपट फ्लॉप झाले आहेत. ‘जुग जुग जियो’हा त्याचा चौथा फ्लॉप चित्रपट आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कलंक’ या चित्रपटात वरुणने भूमिका साकारली होती. या चित्रपटाने १४६ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर २०२० मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ९१ कोटींचा गल्ला जमवला. तर लॉकडाऊन काळात ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘कुली नंबर १’ चित्रपटही फ्लॉप ठरला. अनेक चित्रपट समीक्षकांनी त्याच्या या सर्व चित्रपटावर टीका केली होती.

विश्लेषण : वेबसीरीज, चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन कसे शूट केले जातात?

वरुण धवनचे सलग चार चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अनेकांनी त्याच्या करिअरवर बोट ठेवण्यास सुरुवात केली. यामुळे त्याचे करिअर धोक्यात आले आहे, अशी उलट सुलट चर्चाही सुरु झाली. त्याचा चित्रपटाच्या करिअरचा चढता आलेख हा घसरण्यास सुरुवात झाली आहे, असेही म्हटलं जात आहे. वरुणचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला सुई-धागा हा चित्रपट काही अंशी हिट ठरला होता. त्यात अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. मात्र त्यानंतर प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट फ्लॉप झाले. त्यासोबतच ‘जुडवा २’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र ‘जुगजुग जियो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरी केल्यानंतर वरुण धवनचे करिअर धोक्यात आले आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आगामी चित्रपटावर अवलंबून असणार भवितव्य

वरुण धवन हा सध्या करिअरच्या टर्निंग पॉईंटवर उभा आहे. जर त्याचा आगामी चित्रपट हिट ठरला, त्यात त्याची भूमिका, अभिनय याचे प्रेक्षकांनी कौतुक केले तरच त्याचे झालेले हे नुकसान भरुन निघू शकते. पण जर त्याचा आगामी चित्रपट फ्लॉप ठरला तर मात्र करिअरवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षक, तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

विश्लेषण : चित्रपटाच्या सुरुवातीला झळकणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राचा अर्थ काय?

करिअरवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचे

दरम्यान ‘बॉक्स ऑफिस इंडिया’ने नुकतंच काही अभिनेत्यांची यादी जाहीर केली. या यादीत त्या अभिनेत्यांनी त्यांच्या कारकिर्दीत किती हिट चित्रपट दिले याबद्दल नमूद करण्यात आले होते. या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान हे तीन जण पाहायला मिळत आहेत. तर वरुण धवन या यादीत २२ व्या क्रमांकावर आहे. या यादीत तो इमरान हाश्मीपेक्षाही खालच्या क्रमांकावर आहे.

तसेच बॉबी देओलनेही अनेक वर्षानंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण त्याचेही या यादीत वरुणपेक्षा वरचे स्थान आहे. मात्र, वरुणचे हिट आणि फ्लॉप चित्रपटांची संख्या घेता त्याला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why actor varun dhawan next film could make or break his career know all details nrp

Next Story
विश्लेषण: शिंदे गटाने आमदारांच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंचं नाव का नाही?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी