कोल्हापूर : नागपूर – गोवा या शक्तिपीठ महामार्गाने हजारो एकर पिकाऊ जमीन उद्ध्वस्त होणार असल्याची भीती या मार्गावरील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे याबाबत आंदोलन सुरू आहे. याची दखल घेऊन आता २६ मार्च ( मंगळवारी) याबाबत कोल्हापुरात जनसुनावणीचे आयोजन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शक्तिपीठ महामार्गातील पट्ट्यात मुख्यतः अल्पभूधारक शेतकरी शेती कसतात. भूमि अधिग्रहणामुळे हजारो शेतकरी भूमिहीन आणि अति अल्पभूधारक होणार आहेत. पर्यावरणाचे भयानक नुकसान होऊन आधीच पूरग्रस्त असलेल्या भागाला सतत धोका निर्माण होणार आहे. शेतकरी आणि बाधित लोक शासनाकडे हरकती दाखल करत आहेत.

हेही वाचा : शहीद दिनानिमित्त शाहू महाराजांचे अभिवादन

शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीने या महामार्गाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक त्रिसदस्यीय तज्ञ समिती स्थापन केली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती टी. व्ही. नलवडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आणि रयत शिक्षण संस्थेमधील निवृत्त प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील हे सदस्य आहेत.

हेही वाचा : शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंची वडिलांसाठी खास पोस्ट

या समितीसमोर महामार्गाविषयी कैफियत सादर करण्यासाठी मंगळवार, २६ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात ही जनसुनावणी होईल. तरी सर्व बाधित शेतकरी, शेतकरी संघटना, पर्यावरणाचे अभ्यासक आणि नागरिकांनी आपली मते या समितीसमोर मांडावीत, असे आवाहन करत आहोत. संबंधितांनी आपले मत लेखी स्वरूपात सादर केल्यास सत्य स्थिती समजण्यास मदत होईल, असे डॉ. उदय नारकर यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kolhapur public hearing on nagpur goa shaktipeeth expressway on 26 th march after complaints of farmers css
First published on: 24-03-2024 at 18:23 IST