कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची महाविकास आघाडीची तयार आहे. त्यांनी तशी तयारी न दर्शविल्यास येथे आघाडीचा उमेदवार निश्चितपणे उतरवला जाईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

आमदार जयंत पाटील हे येथील विमानतळावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय घडामोडीवर भाष्य केले. ते म्हणाले, सांगलीमध्ये शिवसेनेने उमेदवार जाहीर केला असला तरी त्यातून काही तोडगा निघतो का यावर चर्चा सुरू आहे. माढा येथील जागा रासपचे नेते महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय पक्षनेते शरद पवार यांनी घेतला होता. त्यांनी त्यास संमतीही दिली होती. ऐनवळी ते महायुतीसोबत गेल्याने येथे दुसरा उमेदवार तयार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

भाजपच्या ३५ हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणेची जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या दोन्ही जागा कमी होत असताना दिसत आहेत. यापेक्षा वेगळे वातावरण महाराष्ट्रात नाही. त्यामुळे त्यांच्या घोषणेला काहीही अर्थ नाही.

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणे सुरू आहे. दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले आमच्या संपर्कात नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.