कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कालावधीत सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्न दाखवली. पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडला. मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेसने त्यांना नऊ प्रश्न विचारले असून त्यातील एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याची त्यांची हिम्मत होत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, प्रदेश सचिव शशांक बावचकर, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार बंद करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला आवर घालण्यात ते अपयशी ठरले आहेत. उलट कर्नाटकामध्ये उलट भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये ४० टक्के पर्यंत भ्रष्टाचार वाढला होता. त्यामुद्द्या वरून सामान्य जनतेने भाजप सरकारला धडा शिकवून सत्ताबदल केला. कर्नाटकच्या विजयामुळे विरोधी पक्षांना शक्ती मिळाली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपला ३१ टक्के तर गेल्या वेळी ३७ टक्के मते मिळाली होती. याचा अर्थ देशातील अजूनही ६५ टक्के जनता भाजपच्या विरोधात आहे.

ती एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना आता गती आली असल्याने केंद्र सरकार घाबरले आहे, असेही चव्हाण म्हणाले. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे. विरोधकांनी आवाज उठवला तर ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची भीती दाखवली जाते. जयंत पाटील यांची आता अशीच चौकशी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.  ही अपयशाची नऊ वर्ष आहेत. त्यामुळे देशीतील जनता आता त्यांना योग्य ते उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi government does not have courage to answer opposition questions prithviraj chavan ysh