लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.

कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते होणार आहे. तर शनिवारी संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. या शिवाय या दौऱ्यात ते कोल्हापुरात आयोजित संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा-कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ

बहुशस्त्रधारी पुतळ्याची रचना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन तैलचित्रांचा अभ्यास करून हा पुतळा बनवण्यात आलेला आहे. यामध्ये डोईवर तुरा, मंदिल आहे. कमरेला पटक्यासह कट्यार व पाठीवर ढाल, उजव्या हातामध्ये पट्टा, डाव्या हातामध्ये धोप (तलवार), पायामध्ये सुंदर नक्षीकाम असलेले चढाव आहेत. याशिवाय पुतळ्याभोवती शिवकालाचे संदर्भ असलेले विषय अंकित करण्यात आले आहेत.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi will visit kolhapur for two days from today mrj