संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे दोन दिवस कोल्हापूरात | Raj Thackeray visits Kolhapur for two days amy 95 | Loksatta

संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे दोन दिवस कोल्हापूरात

मनसे नेते राज ठाकरे मंगळवार व बुधवारी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा उल्लेखनीय ठरणार आहे.

संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे दोन दिवस कोल्हापूरात
संघटनात्मक बांधणीसाठी राज ठाकरे दोन दिवस कोल्हापूरात

मनसे नेते राज ठाकरे मंगळवार व बुधवारी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा उल्लेखनीय ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीवेळी ठाकरे यांनी कोल्हापूर व इचलकरंजी येथे सभा घेतल्या होत्या. त्यानंतर ते मंगळवारी येथे येणार आहेत. दुपारी एक वाजता ठाकरे यांचे येथील ताराराणी चौकात मनसेच्या वतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहामध्ये लोकसभा मतदारसंघ निहाय दोन बैठका संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांच्या उपस्थितीत होणार आहेत. बैठकीसाठी अधिकृत पदाधिकाऱ्यांना मुंबईहून पासेस वितरित करण्यात आले आहेत. बैठकीत ठाकरे पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे चर्चा करून आगामी राजकीय वाटचालीचे नियोजन करणार आहेत. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.

हेही वाचा >>>मोदींची आर्थिक धोरणे पाहता भारत जर्मनी, जपानलाही मागे टाकणार – ज्योतिरादित्य शिंदे

बुधवारी सकाळी राजर्षी शाहू समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते कोकण दौऱ्यावर रवाना होणार आहेत, ही माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पुंडलिक जाधव, राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, विजय करजगार, निलेश लाड, रत्नदीप चोपडे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 21:11 IST
Next Story
मोदींची आर्थिक धोरणे पाहता भारत जर्मनी, जपानलाही मागे टाकणार – ज्योतिरादित्य शिंदे