कोल्हापूर – गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्ह्यातील चार साखर कारखान्यावर ढोल बजावो आंदोलन करून जागर करण्यात आले. सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजावो आंदोलन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी सावकर मादनाईक म्हणाले की, गेल्या वर्षभरात साखरेला व उपपदार्थास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर मिळाले आहेत. साखर कारखान्यांना यामधून चांगल्या पद्धतीने नफा मिळालेला आहे. वाढलेल्या महागाईमुळे औषधे, खते, बी बियाणे, किटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वाढलेल्या या महागाईमुळे शेतकयांचे कंबरडे मोडले आहेत. तोंडावर दसरा आणि दिवाळी आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सणासुदीला पैसे नाहीत. यामुळे कारखान्याकडून तातडीने दुसरा हप्ता ४०० रुपये खात्यावर जमा करण्यात यावे. याबाबत आपणास २ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आज अखेर आपण सदरचा हप्ता जमा न केल्याने ढोल ताशा आंदोलन करून आज आपणास जागे करण्यात येत आहे. उद्यापासून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर वाहतूक अडवून उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच दसऱ्याच्या अगोदर आमच्या हक्काचे ४०० रुपये प्रतिटन न दिल्यास तुमची दिवाळी गोड होणार नाही, असा इशारा सावकर मादनाईक यांनी दिला.

हेही वाचा – कोल्हापूर : संभाजी महाराज पुतळा उभारणीवरून इचलकरंजीत आमदार – माजी नगरसेवकात शाब्दिक चकमक

हेही वाचा – कोल्हापूर : गतिमंद युवतीवर अत्याचार; मलकापुरात कडकडीत बंद, मोर्चा

यावेळी दत्त, गुरूदत्त, जवाहर, पंचगंगा व शरद साखर कारखान्यावर ढोल बजाओ आंदोलन करून ४०० रुपये तातडीने देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, सागर संभूशेटे, शैलेश आडके, सचिन शिंदे, बंडू पाटील, भिमगौंडा पाटील, सागर मादनाईक, वासू भोजणे, विश्वास बालिघाटे आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhimani protest against sugar factory to demand payment of the second installment of sugarcane at rs 400 per ton ssb