scorecardresearch

Premium

कोल्हापूर : संभाजी महाराज पुतळा उभारणीवरून इचलकरंजीत आमदार – माजी नगरसेवकात शाब्दिक चकमक

इचलकरंजी शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कॉ. के. एल. मलाबादे चौक येथे उभारण्याच्या मुद्द्यावरून रविवारी आमदार प्रकाश आवाडे आणि ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

Ichalkaranji
कोल्हापूर : संभाजी महाराज पुतळा उभारणीवरून इचलकरंजीत आमदार – माजी नगरसेवकात शाब्दिक चकमक (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कॉ. के. एल. मलाबादे चौक येथे उभारण्याच्या मुद्द्यावरून रविवारी आमदार प्रकाश आवाडे आणि ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपस्थित लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले.

स्वच्छ भारत अभियान उपक्रमाअंतर्गत इचलकरंजीत प्रत्यक्ष श्रमदानाद्वारे कॉ. मलाबादे चौकात स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि माजी लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. इचलकरंजीत संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. आमदार आवाडे यांनी कॉ. मलाबादे चौकात पुतळा बसविण्यासाठीचा प्रस्ताव इचलकरंजी नगरपरिषदेने द्यावा असे सांगितले होते. तोच धागा पकडत आमदार आवाडे यांनी आज स्वच्छता कार्यक्रमात विषय उपस्थित केला.
ते म्हणाले, शासन दरबारी पाठपुरावा करत पुतळा उभारणीस मी मंजुरी आणली आहे. आता महानगरपालिकेने प्रस्ताव द्यावा. शासन निधीतून कॉ. मलाबादे चौकात पुतळा उभारला जाईल, कोणाला विरोध करायचा त्यांनी करावा.

sanjay-raut-on-devendra-fadnavis-and-eknath-shinde
“वाघनखांनी जसा अफजल खानावर हल्ला झाला तसाच शिंदे-फडणवीस सरकारवरही…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
Shivaji Maharaj
लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा – मुनगंटीवार
Ganapati immersion in Kolhapur Ichalkaranjit Panchgange
प्रशासन, पोलिसांचा विरोध डावलून हिंदुत्ववाद्यांचे कोल्हापूर, इचलकरंजीत पंचगंगेत श्रींचे विसर्जन
gashmeer mahajani on chhtrapati sambhaji maharaj
चाहत्याने थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली तुलना, गश्मीर महाजनी म्हणाला, “माझ्यात त्यांच्या…”

हेही वाचा – जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नथुराम गोडसेचा फोटो घेऊन नाचण्याची घटना, मंत्री गिरीश महाजन म्हणाले…

हेही वाचा – उजनीतील पाणीसाठा झपाट्याने वधारल्याने सोलापूरकर सुखावले 

माजी नगरसेवक सागर चाळके, सदा मलाबादे यांनी आक्षेप घेत छत्रपती संभाजी महाराज चौकात पुतळा उभारण्याचे ठरले असताना कॉ. मलाबादे चौकाचा अट्टाहास का, आजच्या कार्यक्रमात हा विषय काढण्याची गरज काय होती, असा सवाल केला. त्यावरून आमदार आवाडे व चाळके यांच्यात शाब्दिक वाद झाला. आवाडे आपल्या मतावर ठाम राहिल्याने वाद वाढत असल्याचे पाहून खासदार धैर्यशील माने व अन्य लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करत वाद संपुष्टात आणला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Verbal clash in ichalkaranji between mla and former corporator over construction of sambhaji maharaj statue ssb

First published on: 01-10-2023 at 21:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×