कोल्हापूर : बाबरी मशीद ढाचा पतनाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचार विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा होता. नेहमीच्या उचपतखोर वाक्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मंत्री पाटील यांनी वाणी सांभाळावी ,अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मंगळवारी येथे केली आहे.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांचा फोन आणि चंद्रकांत पाटील यांची सारवासारव; बाबरी पतनातील शिवसेनेच्या सहभागाबद्दल स्पष्टोक्ती

बाबरीचा ढाच्या पाडल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचे नेते सुद्धा जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यावेळेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याची जबाबदारी घेतली. शिवसेनाप्रमुखांच्या वाक्याची २५ वर्षानंतर दुरुस्ती करण्याची उपरती भाजपचे एकमेव संस्कारक्षम नेते चंद्रकांत पाटील यांना झाली आहे. महागाई ,बेरोजगारी आणि जनतेमध्ये वाढलेला कमालीचा असंतोष दाबण्याकरता अशाप्रकारे  जनतेची दिशाभूल करून अशा प्रक्षोभक वाक्यांद्वारे लोकांमध्ये संभ्रम करण्याचा हा त्यांचा प्रयत्न दिसत आहे.शिवसेनाप्रमुखांचा अपमान सामान्य शिवसैनिक सहन करणार नाहीत. शिवसेनाप्रमुख, उद्धव ठाकरे शिवसेनेबद्दल वक्तव्य करताना जीभ सांभाळावी,असा इशारा पवार यांनी पाटील यांना दिला आहे.