कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहानुसार महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाजातील कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी असे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातून समाजाचे ३० वर्षे प्रामाणिकपणे काम करणारे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची ताकद निर्माण करणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी मराठा समाजातून होत आहे.

प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा ही लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी करत आहेत. यातच हातकणंगलेमध्ये मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीतही वसंतराव मुळीक यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा – मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

ही लोकसभा निवडणूक जिंकून मराठा आरक्षणाचा कायदा लोकसभेतून मंजूर करून आणावा. या निवडणुकीत समाजातील तरुण जीवाचे रान करून वसंतराव मुळीक यांना निवडून आणतील, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली.

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

सरदार पाटील पोर्ले, मचिंद्र पाटील पारगाव, अशोक गायकवाड माळवाडी, अजित शेलार पोर्ल, आनंदा चौगुले माजगाव, सरदार पाटील अळवे, राजू शिंदे असुर्ले, प्रकाश आडकुर, पोरले, शिवाजी पाटील मले, अमर पाटील, जयदीप पाटील कोडोली. मंगेश पाटील बांबवडे, अमर पाटील शाहूवाडी, शिवाजी पाटील हातकणंगले आदींनी ही मागणी केली आहे.