चंद्रपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्याचे वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी हजारो समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चल-अचल संपत्तीचे माहिती दिली आहे.

चंद्रपूर येथील गिरनार चौकात असलेल्या त्यांच्या बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख २२ हजार ३२४ रुपये आहे, तर त्यांच्याकडे व त्यांच्या कुटुंबियांकडे एकही चारचाकी वाहन नसल्याची माहिती दिली आहे. सध्या त्यांच्याकडे केवळ ९० हजार रुपये रोख असल्याचेही त्यांनी उघड केले आहे.

groom candidate women voters cast vote at polling station
वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
What is the income of BJP candidate Anup Dhotre from Akola
अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचे उत्पन्न किती? जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा – ५४ वर्षांनंतर कॉंग्रेसकडून चंद्रपूरमध्ये महिला उमेदवार

निवडणूक प्रतिज्ञापत्रात मुनगंटीवार यांनी २०१८ च्या आयकर रिटर्नच्या वेळी स्वतःची संपत्ती केवळ ४८ लाख ८० हजार ३६७ रुपये असल्याची माहिती दिली होती. आता ती २०२२-२३ पर्यंत ४९ लाख ८२ हजार १५० रुपयांपर्यंत वाढली आहे. तर त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांचे २०१८ या वर्षात उत्पन्न केवळ २ लाख ६४ हजार १६६ रुपये होते. ते २०२२-२०२३ पर्यंत ४ लाख ९० हजार १७० रुपये झाले आहे. संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांचे उत्पन्न २०१८ साली २९ हजार ७६५ रुपये होते ते सध्या २ लाख ४० हजार रुपये झाले आहे.

मुनगंटीवार यांच्याकडे दाताळा येथे २.१३ एकर शेतजमीन म्हणजेच १९ लाख ९८ हजार ६६२ रुपये तर त्यांच्या कुटुंबाकडे वडगाव येथे १.५७ एकर शेतजमीन म्हणजेच २ कोटी ७५ लाख ८७ हजार ७५० रुपये आहे. भानापेठ परिसरातील गिरनार चौक संकुलात सुधीर मुनगंटीवार यांनी २०१९ ते २०२३ या वर्षात बांधलेल्या बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख २२ हजार ३२४ रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरीत त्यांची स्वतःची संपत्ती ८ कोटी ४९ लाख ९६ हजार ८५२ रुपये, त्यांच्या पत्नीची मालमत्ता १ कोटी १५ लाख ६१ हजार ९२७ रुपये आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मालमत्ता ६ कोटी ९ लाख ३३ हजार १७ रुपयांची आहे. मुनगंटीवार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे केवळ ९० हजार रुपये रोख उपलब्ध आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे ४३ हजार रुपये आणि कुटुंबीयांकडे ३ लाख १७ हजार रुपये रोख आहेत.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

गिट्टी खदान व भद्रावती येथे गुन्हा दाखल

सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर २०१२ साली नागपुरातील गिट्टी खाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२१ मध्ये भद्रावती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत या प्रकरणांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल झालेले नाही.

बँकांमध्ये किती पैसे!

सुधीर मुनगंटीवार यांच्या बँक खात्यात ५ कोटी १४ लाख ८७० हजार रुपये एफडी म्हणून ठेवण्यात आले आहेत. एसबीआय बँकेत पीपीएफ म्हणून ८ कोटी १६ लाख ९८७ रुपये उपलब्ध आहेत. कन्यका नागरी सहकारी बँक बचत खात्यात १७ हजार ६४१ रुपयांव्यतिरिक्त, एसबीआय बचत खात्यात ३१ लाख ६८ हजार ४९४ रुपये आहेत. म्युच्युअल फंडातील त्यांचे शेअर्स १ लाख ३४ हजार ६४० रुपये आहेत. त्यांच्या विमा पॉलिसीची किंमत २३ लाख ८ हजार १७९ रुपये आहे. त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांच्याकडील पोस्ट पीपीएफमध्ये १८ लाख ६१ हजार ५१७ रुपये आहेत. एसकेएनएसबी बचत खात्यात १८ हजार ५८५ रुपये आणि बीओबी बचत खात्यात २ लाख २८ लाख रुपये आहेत. शिक्षक बँकेच्या खात्यात १० लाख ९५ हजार २१६ रुपये आहेत. २२ हजार ५०० रुपये आयडीबीआय बाँड शेअर्सच्या रूपात ३५ हजार ७८३ रुपयांचा एनएससी विमा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या एसबीआय बचत खात्यात फक्त ६९९ रुपये आहेत.

हेही वाचा – सांगलीत हळद दराचा पुन्हा विक्रम

मुनगंटीवार कुटुंबियांनी २० मार्चला घेतले २१ लाखांचे कर्ज

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ९ लाख ४८ हजार ४२७ रुपयांचे कर्ज आहे, जे त्यांनी अवघ्या ६ दिवसांपूर्वी म्हणजेच २० मार्च २०२४ रोजी घेतले होते. तर सपना मुनगंटीवार यांनीही त्याच दिवशी ५ लाख ३८ हजार ४७१ रुपयांचे कर्ज घेतले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबाने २० मार्च रोजीच २१ लाख ८९ हजार ०८३ रुपयांचे कर्जही घेतले आहे. सुधीर मुनगंटीवार, त्यांची पत्नी सपना आणि कुटुंबाकडे चारचाकी वाहन नाही. मुनगंटीवार यांच्याकडे १३ लाख रुपयांचे दागिने आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे ३२ लाख ५० हजार रुपयांचे दागिने आहेत.