BCCI Award Winners List in Marathi: बीसीसीआयच्या नमन अवॉर्ड्स २०२३-२४ चा पुरस्कार सोहळा १ फेब्रुवारी रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रिकेटपटूंना पुरस्कार देत सन्मानित केले. बीसीसीआयने एकूण २६ पुरस्कार देण्यात आले, पाहूया यादी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सचिन तेंडुलकरला बीसीसीआयने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं आहे. तर रवीचंद्रन अश्विनला त्याच्या अमूल्य क्रिकेट योगदानासाठी बीसीसीआय स्पेशल पुरस्कार देण्यात आला. तर टी-२० विश्वचषक विजेत्या क्रिकेटपटूंचाही खास सन्मान करण्यात आला. याशिवाय रोहित शर्मा, स्मृती मानधना, हार्दिक पंड्या आणि जेमिमा रोड्रीग्ज या खेळाडूंनी एकमेकांशी गप्पादेखील मारल्या. ज्यामध्ये त्यांनी एकमेकांच्या आवडी, गाणी, सवयी आणि सामन्यादरम्यान खेळतानाबाबत काही प्रश्न विचारले.

बीसीसीआय नमन पुरस्कार विजेत्यांची यादी (list of all the BCCI award winners)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी – मुंबई क्रिकेट असोसिएशन

देशांतर्गत क्रिकेट – रणजी ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
प्लेट ग्रुप – तनय त्यागराजन हैदराबाद
एलिट ग्रुप – साई किशोर तमिळनाडू

देशांतर्गत क्रिकेट – रणजी ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
प्लेट ग्रुप – अग्नी चोप्रा – मिझोरम

एलिट ग्रुप – रिकी भुई – आंध्रप्रदेश

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू लाला अमरनाथ अवॉर्ड
शशांक सिंग – छत्तीसगढ

रणजी ट्रॉफीत उत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू लाला अमरनाथ अवॉर्ड
तनुष कोटियन

सर्वात्कृष्ट पंच – देशांतर्गत क्रिकेट
अक्षय तोत्रे

वनडे महिला क्रिकेट

दीप्ती शर्मा – सर्वाधिक विकेट
स्मृती मानधाना – सर्वाधिक धावा

सर्वाेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला
आशा शोभना वनडे क्रिकेट

सर्वाेत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरूष
सर्फराझ खान कसोटी

सर्वाेत्कृष्ट महिला क्रिकेटपटू
स्मृती मानधना

सर्वाेत्कृष्ट पुरूष क्रिकेटपटू पॉली उमरीगर अवॉर्ड
जसप्रीत बुमराह

बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड
रवीचंद्रन अश्विन

कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार
सचिन तेंडुलकर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci award winners list of 2023 24 sachin tendulkar jasprit bumrah ravichandran ashwin bdg