Shubman Gill Future Superstar According to Wasim Akram: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिलसाठी २०२३ हे वर्ष एका सुंदर स्वप्नासारखे जात आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. तसेच त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२३ मध्ये त्याने आपल्या शानदार फलंदाजीने सर्व क्रिकेटप्रेमी आणि दिग्गजांना प्रभावित केले आहे.
शुबमन गिलने आयपीएलमध्ये ८९० धावा केल्या आणि ऑरेंज कॅप जिंकली, आता त्याच्यासाठी आगामी आव्हान आहे ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना, पण त्याआधी पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या फलंदाजीची तुलना करत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. या संदर्भात वसीम अक्रम म्हणाला, “जेव्हा मी टी-२० फॉरमॅटमध्ये गिलला गोलंदाजी करेल, तेव्हा मला वाटेल की मी सचिन तेंडुलकरला (एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली १० षटके) गोलंदाजी करत आहे, कारण त्या काळात ३० यार्डच्या सर्कलमधून फक्त दोन क्षेत्ररक्षक बाहेर असतात.”
तो भविष्यातील सुपरस्टार –
वसीम अक्रम पुढे म्हणाला, “जर मी जयसूर्या आणि कालुविथरनाला गोलंदाजी करत असतो, तर मला त्यांना बाद करण्याची संधी मिळाली असती. मी त्यांना आऊट केले असते. कारण त्यांनी मला शॉट मारण्याचे प्रयत्न केले असते, पण सचिन आणि गिलसारखे फलंदाज फक्त क्रिकेटचे शॉट्स खेळतात. त्यामुळे मला वाटते की, गिल हा तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्यपूर्ण धावा करणारा फलंदाज आहे. तो भविष्यातील सुपरस्टार आहे.”
टीम इंडियाच्या २३ वर्षीय युवा फलंदाजाने २०२३ मध्ये, तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६१.२५च्या सरासरीने ९८० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतके झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने टी-२०, आणि कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी १-१ शतक झळकावले आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये ३ शतके झळकावली आहेत.
तसेच शुबमन गिल
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.