Fans Reaction After Rohit Sharma After Rohit Sharma Sacked By BCCI: आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली आहे. रोहितने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेट दिसून येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्मा भारतीय वनडे संघाचा कर्णधार होता. पण बीसीसीआयने रोहितला कर्णधारपदावरून काढून शुबमन गिलची वनडे संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे.
रोहित आणि विराट २०२७ चा वर्ल्डकप खेळणार की नाही? दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार का? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात होते. पण वनडे संघात निवड झाल्यानंतर हे तर स्पष्ट झालं आहे की, दोघेही इतक्यात तर निवृत्ती जाहीर करणार नाहीत. पण बीसीसीआयने ज्या वेगाने गिलला कसोटी संघाचा कर्णधार आणि टी-२० संघाचा उपकर्णधार बनवलं, त्यावरून लवकरच वनडे संघाचं कर्णधारपदही त्यालाच मिळणार अशी शक्यता होती. रोहितचं वनडे संघाचं कर्णधारपद जाणार,त्यामुळे क्रिकेट चाहते चिंतेत होते, अखेर बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेतला.
रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
रोहितला कर्णधारपदावरून काढल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने रोहित शर्माचा फोटो शेअर करत लिहिलं, “क्रिकेट हरलं, राजकारण जिंकलं..”, तर आणखी एका चाहत्याने पोस्ट शेअर लिहिले, “बीसीसीआयला लाज वाटायला हवी…” आणखी एका युजरने पोस्ट शेअर करत लिहिले, “रोहितला कर्णधारपदावरून काढून टाकणं हा धक्कादायक निर्णय आहे.
वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार) रोहित शर्मा, विराट कोहली , श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल.
टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर