इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्या अगोदर सोळाव्या हंगामासाठी मिनी आयपीएल लिलाव प्रक्रिया पडणार आहे. त्यामुळे फ्रँचायझींनी १५ नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयकडे ज्या खेळाडूंना सोडायचे आहे, त्यांची यादी सादर करायची आहे. संघाने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये अष्टपैलू शार्दुल ठाकूरचे मोठे नाव पुढे येत आहे. ठाकूर सध्या ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून उपस्थित आहे.

क्रिकबझच्या बातमीनुसार, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी शार्दुल ठाकूरला सोडू शकते. ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, पण त्याची कामगिरी फारशी खास नव्हती. गेल्या मोसमात, तो १४ सामन्यांत केवळ १२० धावा करू शकला. त्याने १० च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना आणि ३१.५ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या.

बातमीनुसार, दिल्ली फ्रँचायझी ठाकूरला सोडू शकते आणि लिलावात कमी किंमतीत त्याला खरेदी करू शकते. ठाकूर व्यतिरिक्त, फ्रँचायझी यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत आणि फलंदाज मनदीप सिंग यांना देखील सोडू शकते. दिल्लीने लिलावात भरतला 2 कोटी आणि मनदीपला १.१० कोटींना विकत घेतले होते.

हेही वाचा – ENG vs AUS T20 World Cup 2022 : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, ‘या’ प्रमुख खेळाडूला झाली कोरोनाची लागण

कर्णधार ऋषभ पंतने यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळतो, अशा परिस्थितीत भरतच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. त्याचवेळी, गेल्या मोसमात मनदीपला ३ सामन्यांमध्ये संधी मिळाली होती, ज्यामध्ये तो केवळ १८ धावा करू शकला. तसेच आयपीएल २०२३ साठी लिलाव १६ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुर्कस्तानचे इस्तंबूल किंवा बंगळुरू हे ठिकाण निवडले जाऊ शकते.