इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर अनेक विक्रम आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात मैदानात प्रवेश करताच त्याने अजुन एक पराक्रम केला. त्याने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत मायभूमीवर सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम रचला. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अँडरसन त्याच्या कारकिर्दीतील एकूण १६६वा कसोटी सामना खेळत आहे, तर त्याच्या घरच्या मैदानावर हा त्याचा ९५वा कसोटी सामना आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने त्याच्या घरी (भारतात) सर्वाधिक ९४ कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियामध्ये ९२ कसोटीसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक आणि स्टीव्ह वॉ यांनी त्यांच्या घरच्या मैदानावर समान ८९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार जॅक कॅलिस आपल्या देशात ८८ कसोटी सामने खेळला आहे.

हेही वाचा – KBC 13 : हॉट सीटवर बसलेल्या ‘बिग बीं’वर गांगुलीच्या प्रश्नांचा भडीमार; बच्चन म्हणाले, ”दया करा…”

ओव्हलवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी दोन बदल करण्यात आले. भारतीय संघात, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्याबदली उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे, तर इंग्लंड संघात ओली पोप आणि ख्रिस वोक्स यांना जोस बटलर आणि सॅम करन यांची जागा देण्यात आली आहे. पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs ind fourth test james anderson breaks sachin tendulkars record adn