IND vs ENG 2nd Test England Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ जुलैपासून खेळवला जाणार आहे. एजबेस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने दोन दिवस आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. तर संघाचा स्टार खेळाडू कौटुंबिक कारणास्तव संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे, जाणून घ्या.

भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण संघ मात्र विजय मिळवू शकला नाही आणि संघाला ५ विकेट्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. यासह भारतीय संघ पहिल्या कसोटीनंतर ०-१ ने पिछाडीवर आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा एकदा अगोदरच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने एजबॅस्टनमध्ये भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला नव्हता. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तो अचानक संघाबाहेर गेला आहे. ज्यामुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. जोफ्रा आर्चरला जवळजवळ ४ वर्षांनी कसोटी संघात स्थान देण्यात आले. वेगवेगळ्या दुखापतींमुळे तो बराच काळ इंग्लंडच्या कसोटी संघाचा भाग होऊ शकला नाही.

आर्चरने त्याचा अखेरचा कसोटी सामनाही भारताविरूद्ध खेळला होता. आर्चर आता योगायोगाने भारताविरूद्धच कसोटी फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे, पण आता दुसऱ्या कसोटीतून मात्र तो बाहेर झाला आहे. यामुळे इंग्लंडने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. लीड्स कसोटीत जसा इंग्लंडचा संघ होता, तोच संघ दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे.

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.